रॉकेल व रेशन दुकानदारांना वेतन देणारा निर्णय काढा
By Admin | Updated: May 16, 2015 01:24 IST2015-05-16T01:24:23+5:302015-05-16T01:24:23+5:30
राज्यातील रॉकेल विक्रेत्यांना व स्वस्त धान्य दुकानदारांना २० हजार रुपये मासिक वेतन द्यावे, असा शासन निर्णय काढा अशी मागणी ...

रॉकेल व रेशन दुकानदारांना वेतन देणारा निर्णय काढा
गोंदिया : राज्यातील रॉकेल विक्रेत्यांना व स्वस्त धान्य दुकानदारांना २० हजार रुपये मासिक वेतन द्यावे, असा शासन निर्णय काढा अशी मागणी रॉकेल हॉकर्स-रिटेलर्स फेडरेशनचे राज्याध्यक्ष बाबुराव मेश्राम यांनी शासनाला केली आहे.
शासनाने रॉकेलचे कोटे कमी केले ते वाढवावे, असे पत्र दि. १३ फेब्रुवारी २०१५ ला महाराष्ट्र व केंद्र शासनाला त्यांनी पाठविले होते. याअंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून २३ एप्रिल रोजी मेश्राम यांना माहिती दिली आहे. परंतु मासिक वेतनाबाबत आता पर्यंत शासनाकडून कोणत्या प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही.
रॉकेल विक्रेत्यांचे मासिक कोटे जुन्या शासनाने अगोदरच कमी केले होते. त्यानंतर नवीन शासनाने जानेवारी २०१५ मध्ये अजून कोटे कमी केले होते. संघटनेद्वारे विरोध केल्यानंतर फेब्रुवारी व मार्च करिता काही प्रमाणात कोटे वाढविण्यात आले. त्यानंतर एप्रिल, मे व जून करीता शासनाने अजून कोटे कमी करुन रॉकेल विक्रेत्यांच्या पोटावर लात मारली. रॉकेल विक्रेत्यांना प्रति लिटरच्या मागे फक्त २२ पैसे तर स्वस्त धान्य दुकानदारांना प्रति किलोच्या मागे फक्त ७० पैसे कमिशन मिळते.
राज्यातील रॉकेल विक्रेता व स्वस्त धान्य दुकानदारांचा पुर्ण संबंध शासनाशी आहे. शासनाकडून २० हजार मासिक वेतन देण्याचा शासन निर्णय पारित करावा. शासनाचा माल जनतेला वाटप करण्याची ४० वर्षापासून नोकरी करीत आहेत.
मात्र त्यांना योग्य मोबदला मिळत नाही. राज्यातील रॉकेल विक्रेता व स्वस्त धान्य दुकानदारांना २० हजार रुपये मासिक वेतन देण्याचा शासन निर्णय काढावा अन्यथा संपुर्ण राज्यात तिव्र आंदोलन करण्यात येईल, ईशारा मेश्राम यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)