नियोजन करा, अपघात टाळा
By Admin | Updated: January 13, 2017 01:04 IST2017-01-13T01:04:59+5:302017-01-13T01:04:59+5:30
जिल्ह्यात मागील वर्षी रस्ता अपघातात जेवढे मृत्यू झाले ते प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षा कमी करावयाचे आहे.

नियोजन करा, अपघात टाळा
अभिमन्यू काळे : २८ वा रस्ता सुरक्षा अभियानाचे थाटात उद्घाटन
गोंदिया : जिल्ह्यात मागील वर्षी रस्ता अपघातात जेवढे मृत्यू झाले ते प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षा कमी करावयाचे आहे. रस्ता अपघातास कारणीभुत घटकांचा शोध घ्यावा लागणार आहे. अपघात टाळण्यासाठी ज्या सूचना देण्यात आल्या आहेत, त्यांचे पालन होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आतापासूनच योग्य नियोजन करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या २८ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उदघाटक म्हणून काळे बोलत होते.
याप्रसंगी प्रामुख्याने जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, सहायक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संगीता भिसे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण उपस्थित होते.
हे अभियान दरवर्षी राबविण्यात येत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी काळे पुढे म्हणाले, यावर्षी अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी काही उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्र मात पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, तसेच इतर यंत्रणासह विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा राहणार आहे. यावर्षी जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय बांधून जिल्हा हागणदारीमुक्त करावयाचा आहे. जिल्ह्यातील माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी देखील उपक्र म राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. पुलकुंडवार म्हणाले, केवळ अभियानाचे आयोजन करून सुरक्षीतता मिळणार नाही. रस्त्यावर प्रत्येक जण सुरक्षीत कसा राहील, हे महत्वाचे आहे. अपघात होण्याचे कारण शोधून ते टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. चालक हा चांगला प्रशिक्षित असला पाहिजे. चालकाची मानिसकता तपासणे देखील महत्वाचे आहे. वाहतूक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी तातडीने धावून गेले पाहिजे. १०८ क्र मांकाच्या रु ग्णवाहिका सेवेची माहिती प्रत्येकाला झाली तर अशाप्रसंगी अपघातग्रस्तांना वेळीच वैद्यकीय सुविधा पुरविता येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी सोनाली चव्हाण व डॉ.संगीता भिसे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून उप प्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण यांनी राज्यातील अपघाताची स्थिती व रस्ता सुरक्षा अभियानाबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाला शहरातील अनेक शाळांतील विद्यार्थी, ड्रायव्हींग स्कूलचे संचालक, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सहायक मोटर वाहन निरीक्षक संदीप पवार, प्रभाकर पेन्सीलवार, अनिरूध्द देवधर, कर्मचारी प्रशांत मांडवेकर, राहुल कुरतोडवार, राठोड, गुल्हाणे, विग्रे, मोहोड, वानखेडे, करु णा बसवनाथे, सविता राजुरकर यांनी सहकार्य केले. संचालन सुजाता बहेकार यांनी केले. आभार संदीप पवार यांनी मानले. (प्रतिनिधी)