भारनियमनाचा भार कायम
By Admin | Updated: January 10, 2015 22:57 IST2015-01-10T22:57:34+5:302015-01-10T22:57:34+5:30
विजेच्या उपलब्धतेत झालेली वाढ व तत्सम कारणांमुळे महावितरणने गोंदिया विभागांतर्गत येणाऱ्या तीन तालुक्यात फिडरवरील भारनियमनाच्या कालावधी व वेळेत बदल केले आहेत.

भारनियमनाचा भार कायम
गोंदिया : विजेच्या उपलब्धतेत झालेली वाढ व तत्सम कारणांमुळे महावितरणने गोंदिया विभागांतर्गत येणाऱ्या तीन तालुक्यात फिडरवरील भारनियमनाच्या कालावधी व वेळेत बदल केले आहेत. महावितरणने केलेले हे बदल ३ जानेवारीपासून लागू झाले आहेत.
विशेष म्हणजे यातील आकडेवारी बघितल्यास ४६ पैकी १७ फिडर्सवर आजघडीला भारनियमन सुरू आहे. यातील रतनारा फिडरवर सर्वाधिक ९.१५ तासांचे भारनियमन सुरू असल्याचे दिसून येत असून उर्वरीत फिडर्सवर वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर भारनियमन सुरू करण्यात येणार असल्याचे कळले.
महावितरणने ठरवून दिल्यानुसार, ४६ फिडर्सच्या वेळापत्रकांत बदल करण्यात आला आहे. यातील १७ फिडर्सवर आजघडीला भारनियमन सुरू असून उर्वरीत फिडर्स भारनियमनमुक्त आहेत. विशेष म्हणजे काही फिडर्सवर आजघडीला भारनियमन होत नसले तरी वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर या फिडर्सवरील ग्राहकांनाही भारनियमनाचा फटका सहन करावाच लागणार असल्याचे महावितरणने स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे भारनियमनाच्या करंटपासून कुणीही सुटणार नाही हे मात्र नक्की. (शहर प्रतिनिधी)