वित्तीय व्यवस्थापन आणि जोडव्यवसायाची कास धरा

By Admin | Updated: December 31, 2016 01:36 IST2016-12-31T01:36:36+5:302016-12-31T01:36:36+5:30

शेतकऱ्यांची परिस्थिती तशीही हलाखीची असते. अशात जनावरांच्या महागड्या चाऱ्याची खरेदी करण्यात

Maintain financial management and engagement | वित्तीय व्यवस्थापन आणि जोडव्यवसायाची कास धरा

वित्तीय व्यवस्थापन आणि जोडव्यवसायाची कास धरा

सभापती शिवणकर यांचे आवाहन : सकस आहार तयार करण्याचे प्रशिक्षण
इसापूर : शेतकऱ्यांची परिस्थिती तशीही हलाखीची असते. अशात जनावरांच्या महागड्या चाऱ्याची खरेदी करण्यात अधिक तोटा आहे. अशात जनावरांचे खाद्य घरीच तयार केल्यास शेतकऱ्यांचे पैसे वाचतील. शेतकऱ्यांनी वित्तीय व्यवस्थापन व जोड व्यवसायाची कास धररून सर्वांगीण विकास करावा असे आवाहन पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर यांनी केले.
वित्तीय व्यवस्थापन व सकस जनावर चारा तयार करण्याचे प्रात्यक्षीक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती आशा झिलपे तर वित्तीय व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषद उपमुख्य लेखा अधिकारी जवंजाळ व सहायक पशुधन आयुक्त ए.डी.डांगोरे उपस्थित होते.
याप्रसंगी उपमुख्य लेखा अधिकारी जवंजाड यांनी, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांचे वेगवेगळे फंड व त्यांचे कार्य कसे चालते ते समजावून पं.स. पदाधिकाऱ्यांना त्याची इत्थंभूत माहिती दिली. पदाधिकारी जर शिकले तर ते आपल्या भागाचा सर्वांगिण विकास करुन ग्रामीण भागातून विकास प्रवाहात आणतील तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद यांचे कार्य समजावून सांगितले. तर सहाय्यक पशुधन आयुक्त डांगोरे यांनी, महागडे सकस आहार खरेदी करणे व जास्त खर्चात गेल्याने बळीराजाच्या उत्पादन खर्चात वाढ होते. त्यापेक्षा आपल्या जनावरांना महागडे पशुखाद्य देणे टाळून कमी खर्चात जनावरांना सकस आहार देण्यासाठी १ किलो तणसावर ६० लीटर पाणी, ३ किलो युरिया, १ किलो मीठ यांचे द्रावण बनवून तणसावर शिंपळून ३ ते ४ आठवडे हवाबंद स्थितीत ठेऊन नंतर गुरांना थोडे-थोडे जनावरांना खाऊ घातल्यास त्यांना सुग्राससारखे पोष्टीक आहार यातून मिळतो हे सर्वांना प्रात्याक्षिकासह समजावून सांगून अल्पखर्चात जनावरांचे व्यवस्थापन समजावून सांगितले.
या प्रशिक्षणाला पं.स.समितीचे सर्व पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी डॉ.एल.के. बारापात्रे, डॉ.एन.झेड. लुटे, डॉ. दीपक मदीकुंटावार, डॉ. बावणे, सुखदेव राऊत, दिनेश राऊत, हिरेश भोयर, शिशूपाल डोंगरे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: Maintain financial management and engagement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.