ग्रामपंचायतींवरही महिलाराज

By Admin | Updated: July 3, 2015 01:58 IST2015-07-03T01:58:42+5:302015-07-03T01:58:42+5:30

सरपंचांचे आरक्षण जाहीर : १८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी २५ जुलैला मतदान

Mahilraj also on Gram Panchayats | ग्रामपंचायतींवरही महिलाराज

ग्रामपंचायतींवरही महिलाराज

सरपंचांचे आरक्षण जाहीर : १८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी २५ जुलैला मतदान
गोंदिया : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा रणसंग्राम शांत होण्याच्या आधीच ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत आहे. जिल्ह्यातील ५५६ ग्रामपंचायतींपैकी १८२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक येत्या २५ जुलै घेण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यासाठी गुरूवारी (दि.२) सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यात पहिल्यांदाच ५० टक्के सरपंचपद विविध प्रवर्गाच्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषद- पंचायत समित्यांपाठोपाठ ग्रा.पं.वरही महिलाराज येणार आहे.
सर्व तहसील कार्यालयांमध्ये दुपारी २ वाजता काढण्यात आलेल्या या सोडतीत येत्या २५ जुलैला होणाऱ्या निवडणुकीसोबत इतरही ग्रामपंचायतींच्या सरपंचांची आरक्षण सोडत काढण्यात आली. ५० टक्के महिला आरक्षणामुळे अनेक प्रस्थापितांना सरपंचपदावरील आपले वर्चस्व सोडावे लागणार आहे. दि.२५ जुलै रोजी १८२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक आणि ७ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
या १८२ ग्रामपंचायतींमध्ये होणार निवडणूक
गोंदिया तालुका-
तालुक्यात २८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहेत. यात बलमाटोला, भानपूर, धापेवाडा, गंगाझरी, खर्रा, लोधीटोला चु., लोधीटोला धा., सोनबिहरी, बघोली, चंगेरा, गर्रा बुज., गिरोला, जिरूटोला, कोचेवाही, कोरणी, मोगर्रा, नवेगाव पां., परसवाडा, रावणवाडी, सावरी, बनाथर, बिरसोला, छिपीया, एकोडी, कासा, काटी, पोवारीटोला, सेजगाव यांचा समावेश आहे.
आमगाव तालुका-
आमगाव तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीमध्ये गोसाईटोला, जामखारी, कालीमाटी, कट्टीपार, किकरीपार, कुंभारटोली, महारीटोला, मरारटोला, मुंडीपार, रामाटोला, सरकारटोला, शिवनी, सोनेखारी, ठाणा, वळद, येरमडा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
गोरेगाव तालुका-
तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमध्ये बोरगाव, चिल्हाटी, घोटी, हिरापूर, कालीमाटी, कवलेवाडा, खाडीपार, म्हसगाव, मोहगाव बु., पाथरी, शहारवानी, तिल्ली, तुमसर, आसलपाणी, चिचगाव, चोपा, गिधाडी, गोदेखारी, हिराटोला, मलपुरी, मेंगाटोला, निंबा, सोनी, सोनेगाव, तेढा, तेलनखेडी यांचा समावेश आहे.
सडक अर्जुनी तालुका-
तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींमध्ये चिखली, पळसगाव/राका, कोसबी, रेंगेपार पा., घाटबोरी/तेली, कोकणा जमी., कोसमतोंडी, बौद्धनगर, खोबा, मुरपार/लेंडे, पांढरी, सिंधीपार, दल्ली, घाटबोरी/कोहळी, कोदामेंडी, कोयलारी, घटेगाव, दोडके जा. यांचा समावेश आहे.
सालेकसा तालुका-
तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींमध्ये कारुटोला, कावराबांध, कोटजंभोरा, कोटरा, मानागड, मुंडीपार, पाऊलदौना, पोवारीटोला, सातगाव या ९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
तिरोडा तालुका-
तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींमध्ये बेरडीपार का., बेरडीपार खु., बोपेसर, धादरी, पालडोंगरी, पिंडकेपार, सेलोटपार, बोदलकसा, डब्बेटोला, खोपडा, लोणारा, नवरगाव, सतोना, सोनेगाव, आलेझरी, घोगरा, गोंडमोहाडी किं., नहरटोला, सर्रा यांचा समावेश आहे.
अर्जुनी मोरगाव तालुका-
तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींमध्ये बाराभाटी, भरनोली, बोंडगावदेवी, दिनकरनगर, इसापूर, कन्हाळगाव, कवठा, कोरंभीटोला, कुंभीटोला, महागाव, माहुरकुडा, मांडोखाल, सावरटोला, सिलेझरी, तिडका, बोंडगाव सु. , बोरी, देवलगाव, इळदा, जानवा, करांडली, केशोरी, परसटोला, परसोडी रै., पवनी/धाबे, प्रतापगड, येगाव, झाशीनगर, बोरटोला यांचा समावेश आहे.

Web Title: Mahilraj also on Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.