भंडारा अर्बन बँंकेच्या संचालकपदी महेश जैन
By Admin | Updated: July 12, 2015 01:49 IST2015-07-12T01:49:30+5:302015-07-12T01:49:30+5:30
गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील व्यापारी बँकेच्या नावाने परिचित असलेल्या दि भंडारा अर्बन को-आॅपरेटिव्ह..

भंडारा अर्बन बँंकेच्या संचालकपदी महेश जैन
गोंदिया : गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील व्यापारी बँकेच्या नावाने परिचित असलेल्या दि भंडारा अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेच्या १९ शाखा संचालकांच्या निवडणुकीत देवरी येथील महेशकुमार जैन पुन्हा एकदा विजयी झाले.
भंडारा येथे पार पडलेल्या मतमोजणीत सहकार पॅनलचे १२, गुर्जर पॅनलचे ६ व जनहित पॅनलचे १ असे १९ संचालक विजयी झाले. यात देवरी व आमगावमधून बँकेच्या संचालकपदी महेशकुमार जैन यांनी निवड झाली. संचालकांमध्ये सर्वाधिक १७०२ मते घेऊन ते सलग पाचव्यांदा विजयी झाले.
दि भंडारा अर्बन को-आॅप. बँकेच्या १९ शाखा संचालकपदाची निवडणूक ५ जुलै रोजी पार पडली. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (दि.७) पोलीस मुख्यालय भंडारा येथे करण्यात आली. यात १९ शाखा संचालकांचे निकाल लागले. यात सहकार पॅनलचे १२, गुर्जर पॅनलचे सहा व जनहित पॅनलचे एक असे १९ संचालक निवडून आले.
देवरी व आमगाव शाखेच्या संचालकपदाकरिता सहकार पॅनलकडून झामसिंग येरणे हे मैदानात होते. वरील दोन्ही शाखेत एकूण २४४६ सभासद मतदार आहेत. त्यापैकी १९५२ सभासद मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ३० मते अवैध ठरविण्यात आली.
या निवडणुकीत झामसिंग येरणे यांना २०० मते मिळाली. महेशकुमार जैन यांना अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी देवरी व आमगाव शाखेतील सर्व सभासदांनी केली आहे. (प्रतिनिधी)