ग्राहक मंचचा महावितरणला झटका
By Admin | Updated: November 27, 2014 23:36 IST2014-11-27T23:36:45+5:302014-11-27T23:36:45+5:30
ग्राहकाने जुने विद्युत मीटर बदलवून नवीन इलेक्ट्रॉनिक मीटर लावले. त्यानंतर त्यांना सरासरी युनिट दाखवून बिल पाठविण्यात येत होते. ग्राहकाने वारंवार विनंती करूनही विद्युत विभागाने दखल

ग्राहक मंचचा महावितरणला झटका
गोंदिया : ग्राहकाने जुने विद्युत मीटर बदलवून नवीन इलेक्ट्रॉनिक मीटर लावले. त्यानंतर त्यांना सरासरी युनिट दाखवून बिल पाठविण्यात येत होते. ग्राहकाने वारंवार विनंती करूनही विद्युत विभागाने दखल न घेता ५७ हजार ७२० रूपयांचे वाढीव बिल कमी करण्यात आले नाही. त्यामुळे ग्राहक न्यायमंचात धाव घेतली. ग्राहक मंचाने दोन्ही पक्षांच्या युक्तिवादाची कारणमिमांसा करून महावितरणला दोषी ठरविले.
राधेश्याम लालू खोब्रागडे रा.कारुटोला ता. सालेकसा असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. तो मीटर रिडिंगनुसार विद्युत वापराचे बिल भरत असे. मात्र विद्युत विभागाने कारण नसतानाही सन २००६ मध्ये त्यांचे जुने मीटर काढून नवीन इलेक्ट्रानिक विद्युत मीटर लावले. तेव्हापासून त्यांनी वापरलेल्या युनिटचे बिल न देता विद्युत विभागाने शेवटपर्यंत सरासरी बिल दिले. शिवाय प्रत्येक बिलमध्ये ‘रिडिंग नॉट अव्हेलेबल’ असे लिहून येत होते. तसेच प्रत्येक बिलामध्ये वापरलेल्या युनिटचे मीटर रिडिंग ६९९२ दाखविले जात होते. त्यामुळे त्यांनी युनिटप्रमाणे बिल देण्यात यावे व मागील बिलांमध्ये दुरूस्ती करून योग्य बिल देण्यात यावे, अशी लेखी व तोंडी विनंती त्यांनी विद्युत विभागाला केली होती. यावेळी तांत्रिक अडस्येमुळे असे होत असून संपूर्ण बिल दुरूस्त करून त्यांना ३६ हजार ४० रूपयांचे थकित असलेले बिल जून २०१२ मध्ये देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
खोब्रागडे यांच्या घरी लावलेले मीटर व्यायसायीक प्रयोजनासाठी असल्याचे लक्षात आल्यावर घरगुती असलेल्या बिलात बदल करून व्यायसायीक प्रयोजनासाठी गणना करून त्यांना बिल देण्यात आले. शिवाय १८ हजार ४३५ रूपयांची सुट देण्यात आली. बाकी असलेले ३६ हजार ४० रूपये भरल्यानंतर विद्युत पुरवठा सुरू होणार होता. परंतु खोब्रागडे यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, सुट देण्यात आली असली तरी विद्युत विभागाने ग्राहकाला तक्रार करेपर्यंत कळविले नव्हते. शिवाय खोब्रागडे वेळोवेळी जात असतानाही त्यांना कुठल्याही प्रकारची सुट किंवा दुरूस्ती बिल देण्यात आले नव्हते. सरासरी बिलापोटी १८ हजार ४३५ रूपयांची सुट म्हणजे त्यांच्या सेवेतील त्रुटी आहे. तसेच न्यायमंचात प्रकरण दाखल करण्यापूर्वी विद्यत विभागाने कुठल्याही पत्रव्यवहाराद्वारे ही बाब तक्रारकर्ते खोब्रागडे यांना कळविली नव्हती, असे सांगितले. शिवाय विद्युत मीटरची पाहणी केल्याचा निरीक्षण अहवाल विद्युत विभागाने सदर प्रकरणात दाखल केला नाही. त्यामुळे ग्राहकाने घरगुती मीटर व्यावसायीक प्रयोजनासाठी वापरले, हे ग्राह्य धरण्यासाठी विद्युत विभागाने कसलाही पुरावा दाखल केला नाही. (प्रतिनिधी)