महात्मा गांधी रोजगार हमीच्या कामात घोळ
By Admin | Updated: October 17, 2015 02:30 IST2015-10-17T02:30:50+5:302015-10-17T02:30:50+5:30
जवरी येथील बहुचर्चित रोजगार सेवक अशोक सिताराम गायधने याने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या ...

महात्मा गांधी रोजगार हमीच्या कामात घोळ
जवरी येथील प्रकरण : होमगार्डच्या चौकशीची मागणी
आमगाव : जवरी येथील बहुचर्चित रोजगार सेवक अशोक सिताराम गायधने याने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत आहे. नाला सरळीकरण, मामा तलाव खोलीकरण, गेट चौकी तलाव या कामात मजुरांची बोगस नोंद, तसेच लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची लेखी तक्रार करून चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
जवरी येथील धनराज हरी हटवार हा आमगाव पोलीस ठाण्यात गृहरक्षक म्हणून त्या काळात काम करीत होता. सदर व्यक्ती हजेरी क्रमांक ३७०४ वर २७ ते ३० जून पर्यंत मजूर म्हणून त्यांची नोंद करण्यात आली. या धनराज हटवारला चारशे पन्नास रुपये रोजी दाखविण्यात आली. त्यांच्या सोबत असलेल्या पंचेविस ते तिस लोकांना १३५ रुपये मजूरी मिळाली. काम एक मग सर्व मजुरांना सारखी मजूरी मिळने आवश्यक होते. मात्र ते या ठिकाणी झाले नाही. धनराज हरी हटवार होमगार्ड आहे. तो २७ ते ३० जून या कालखंडात करंजी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या बंदोबस्ताकरिता कार्यरत होता. मात्र त्याच कालखंडातील त्याची हजेरीवर उपस्थिती दाखविण्यात आली. विशेष म्हणजे ३० जून रोजी सर्व मजुरांचे वेतन झाल्याचे दाखविण्यात आले. जवळपास २५० ते ३०० मजूर कामावर कार्यरत होते. त्या मजुरांकडून प्रत्येकी विस रुपये रोजगार सेवकांनी मजुरांकडून घेतले. शासनाकडून पैसे घेण्याचा कोणताच आदेश नसतानाही वसुली बेकायदेशिर असल्याचा आरोप जवरी ग्रामस्थांनी करुन चौकशीची मागणी केली आहे.
हजेरी क्रमांक ३११५ च्या एम.बी. नंबर नाही. हजेरी पटावर विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, रोजगार सेवकाची याची स्वाक्षरी नाही. हजेरी पटावर दहा मजुरांचे खोटे नाव दाखविण्यात आले. गावकऱ्यांनी माहितीच्या अधिकारात जी माहिती मिळाली तेथे १० व्यक्तीचे नाव कमी करण्यात आले. त्या लोकांची १३५, १५५, १६५ या दराने रोजी काढण्यात आली. मात्र ते मजूर कामावर गेलेच नाहीत. यात मोहीनी अशोक गायधने, शकुंतला शामलाल मेंढे, वर्षा अशोक डोये (ही मुलगी शिक्षण घेत आहे), तसेच अमृत बकाराम गायधने, अमोल राधेशाम गायधने, राधेशाम बकाराम गायधने, आशा विजय दिवाडे, रंजना अजय दिवाडे एवढ्या मजुरांचे काम करण्यात आले. हे सत्य माहितीच्या अधिकारामार्फत समोर आले. मामा तलावावर मोहीनी अशोक गायधने, अमृत बकाराम गायधने, सरस्वता रमनलाल हत्तीमारे, आशा विजय दिवाळे, वर्षा अशोक डोये हे मजूर कधी गेले कधी गेले नाही.
विशेष म्हणजे मामा तलाव कामावर वरील मजूर कार्यरत होते. चौकी तलावाच्या कामावर ईश्वरदास धानू गायधने, दुलीचंद नत्थू पाथोडे, अमोल राधेशाम गायधने, ज्योती प्रमोद तिरपुडे, मनिराम गणपत फुंडे हे मजूर कामावर गेले नाही. मात्र मजुरांची मजुरी उचलण्यात आली. या गावात सन २००८-०९ पासून मामातलाव खोलीकरण, नाला सरळीकरण, चौकीतलाव या कामावर जवळपास तिनशे मजूर कार्यरत होते. सदर तिन्ही कामे महात्मा गांधी रोजगार हमी योजना व जिल्हा परिषद गोंदियाअंतर्गत करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)