शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!

By अंकुश गुंडावार | Updated: November 25, 2024 14:54 IST

महायुतीने यावेळी या दोन्ही जिल्ह्यांतील उमेदवारांना निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी ही खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर सोपवली होती.

अंकुश गुंडावार, गोंदिया Maharashtra Elections 2024: गोंदिया-भंडारा जिल्ह्यांतील राजकारण हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हेवीवेट नेते खासदार प्रफुल्ल पटेल व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याभोवती केंद्रित राहिले आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीविरुद्धमहायुती अशी लढत झाली असली, तरी खरी प्रतिष्ठा ही पटेल आणि पटोले यांची पणाला लागली होती. दोन्ही वजनदार नेते असल्याने त्यांचे गृहजिल्हे असल्याने या दोन्ही जिल्ह्यांत नेमकी कोण बाजी मारतो, याकडे राज्य व देशाचे लक्ष लागले होते. महायुतीने दोन्ही जिल्ह्यांत ७ पैकी ६ जागा जिंकल्याने वर्चस्वाच्या लढाईत पटोलेंवर पटेलच वरचढ ठरले.

गोंदिया-भंडारा जिल्ह्यांत महायुतीचे उमेदवार ठरविण्यात खा. प्रफुल्ल पटेल, तर महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित करण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. त्यातच या दोन्ही नेत्यांमधील शीतयुद्ध सर्वांनाच परिचित आहे. 

महायुतीने यावेळी या दोन्ही जिल्ह्यांतील उमेदवारांना निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी ही खा. पटेल यांच्यावर सोपवली होती. त्यामुळे त्यांनी प्रचारादरम्यान तब्बल आठ दिवस या दोन्ही मतदारसंघांत तळ ठोकून मोर्चेबांधणी केली निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांत कुठलेही मतभेद निर्माण होऊन त्याचा उमेदवाराला झटका बसू नये, याची काळजी घेतली. 

प्रचारादरम्यान विरोधकांवर टीकाटिप्पणी करण्यापेक्षा महायुती सरकार काय करणार, यावर भर दिला निवडणुकीदरम्यान त्यांनी सूक्ष्म नियोजन केले. यामुळेच प्रथमच महायुतीचे ७ पैकी १ उमेदवार निवडून आले.

पटोले करतील का आत्मपरीक्षण? 

दोन्ही जिल्ह्यांत उमेदवारी देताना काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला होता. तसेच पक्षाला याचा फटका बसेल, असा इशारादेखील दिला होता, पण यानंतरही पटोलेंनी याची दखल घेतली नाही. परिणामी, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे पटोले आता या सर्व गोष्टींचे आत्मपरीक्षण करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीNana Patoleनाना पटोलेPraful Patelप्रफुल्ल पटेल