शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
5
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
6
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
7
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
8
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
9
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
10
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
11
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
12
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
13
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
14
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
15
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
16
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
17
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
18
साचलेले प्रश्न, दमलेले कार्यकर्ते, मरगळलेला प्रचार
19
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
20
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी

Maharashtra Election 2019 ; कोण घेणार माघार,कोण राहणार कायम कळणार आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 6:00 AM

गोंदिया, आमगाव, अर्जुनी मोरगाव, तिरोडा या चारही मतदारसंघातून एकूण ७६ उमेदवारांनी १२२ नामाकंन दाखल केले होते. मात्र छाननी दरम्यान काही उमेदवारांनी पक्षाचा एबी फार्म न जोडल्याने तर काहींच्या अर्जात त्रृट्या असल्याने एकूण पाच उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात आले. त्यामुळे आता चारही मतदारसंघातून ७१ उमेदवार रिंगणात आहेत.

ठळक मुद्देउमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस : सर्व मतदार संघातील लढतीचे चित्र होईल स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी २७ आॅक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. शनिवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर चारही मतदारसंघातून आता ७१ उमेदवार रिगंणात आहे. मात्र यात सुध्दा सर्वच पक्षातील बंडखोर उमेदवारांची संख्या अधिक आहे.त्यामुळे त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न पक्षाकडून सुरू आहे. सोमवारी कोण माघार घेणार आणि कोण कायम राहणार हे स्पष्ट होणार आहे. यानंतरच निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरूवात होणार आहे.गोंदिया, आमगाव, अर्जुनी मोरगाव, तिरोडा या चारही मतदारसंघातून एकूण ७६ उमेदवारांनी १२२ नामाकंन दाखल केले होते. मात्र छाननी दरम्यान काही उमेदवारांनी पक्षाचा एबी फार्म न जोडल्याने तर काहींच्या अर्जात त्रृट्या असल्याने एकूण पाच उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात आले. त्यामुळे आता चारही मतदारसंघातून ७१ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.त्यानंतर चिन्हाचे वाटप होऊन निवडणुकीच्या प्रचाराला रंगत येणार आहे.सोमवारी या चारही मतदारसंघातील पक्षातून बंडखोरी करणारे उमेदवार आपले अर्ज मागे घेतात की ते त्यांच्या भूमिकेवर कायम राहतात, हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गोंदिया विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार विनोद अग्रवाल,आमगाव मतदारसंघात माजी आ.रामरतन राऊत, तिरोडा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ.दिलीप बन्सोड आणि अर्जुनी मोरगाव मतदारसंघात काँग्रेसचे राजेश नंदागवळी, आनंद जांभुळकर हे अपक्ष उमेदवार सोमवारी नेमकी काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्यातील सर्व मतदारांचे आणि राजकीय पक्षांचे सुध्दा लक्ष लागले आहे.सर्वाधिक उमेदवार गोंदिया मतदारसंघातजिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातून एकूण पाच उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर ७१ उमेदवार रिगंणार आहेत. यात सर्वाधिक २५ उमेदवार गोंदिया विधानसभा मतदारसंघात असून त्यापाठोपाठ अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून २०, तिरोडा १६ आणि आमगाव मतदारसंघातून सर्वात कमी १६ उमेदवार रिंगणात आहेत.प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी फोडला प्रचाराचा नारळसर्वच प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी शनिवारपासूनच प्रचाराचा नारळ फोडत मतदारसंघात सभा बैठका घेण्यास सुरूवात केली आहे.बहुतेक उमेदवार सकाळी ७ वाजतापासूनच मतदारसंघात सक्रीय होत असल्याचे चित्र आहे.गावातील हॉटेल आणि पानठेल्यांना सुध्दा ते आवर्जून भेट देत आहे.आघाडी युतीचे नेते लागले कामालाअधिकृत पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली असून त्या पक्षाचे नेते सुध्दा कामाला लागल्याचे चित्र आहे.आघाडी उमेदवाराच्या प्रचारार्थ खा.प्रफुल्ल पटेल, माजी खा.नाना पटोले हे सोमवारी गोंदिया येथे सभा घेणार आहेत.तर युतीचे प्रमुख नेते सुध्दा मतदारसंघात सक्रीय झाले आहेत.दसऱ्यात होणार स्नेहमिलनविधानसभा निवडणुकांच्या काळात दसरा आल्याने उमेदवारांना स्रेहमिलन कार्यक्रम घेऊन संवाद साधण्याची नामी संधी चालून आली आहे. त्यामुळे दसऱ्याला सर्वच पक्षाच्या उमेदवारांकडून स्रेहमिलन कार्यक्रम घेण्याचे नियोजन आखले जात आहे.

टॅग्स :gondiya-acगोंडिया