Maharashtra Election 2019 : लोकप्रतिनिधी आणि सरकारची विचारधारा एक हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 05:00 AM2019-10-15T05:00:00+5:302019-10-15T05:00:07+5:30

निवडणूक प्रचारार्थ मरारटोली रेल्वे क्रासींग, वसंतनगर, पुनाटोली, पाल चौक, रामनगर, बलमाटोला, दासगाव बु., बिरसी, ढाकणी, लोधीटोला, चुटीया, रापेवाडा, पांगडी येथे सोमवारी आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने भाजप शहरध्यक्ष सुनील केलनका, नंदू बिसेन, दीपक कदम, पंकज यादव, कल्लू यादव, कान्हा यादव, प्रकाश रहमतकर, अशोक चौधरी, चमनलाल बिसेन, रमेश अंबुले, विजय लोणारे, स्रेहा गौतम, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.गोपालदास अग्रवाल म्हणाले, गोंदिया विधानसभा क्षेत्रातील जनतेला केवळ विकास हवा आहे.

Maharashtra Election 2019 : Representation of the people and the ideology of the government are a must | Maharashtra Election 2019 : लोकप्रतिनिधी आणि सरकारची विचारधारा एक हवी

Maharashtra Election 2019 : लोकप्रतिनिधी आणि सरकारची विचारधारा एक हवी

googlenewsNext
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : दासगाव, बलमाटोला, ढाकणी येथे प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील पंधरा वर्षांपासून आपण विकासाच्या मुद्दावरच निवडणूक लढत आहे. केवळ विकासाच्या नावावर राजकारण करण्यावर आपला विश्वास आहे. त्यामुळेच आपण विकासाच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोंदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वास ठेवीत भाजपमध्ये प्रवेश केला. विकासाच्या मार्गावर पुढे जायचे असेल तर लोकप्रतिनिधी आणि सरकारची विचारधारा ही एक असायला हवी असे प्रतिपादन भाजप-सेना युतीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
निवडणूक प्रचारार्थ मरारटोली रेल्वे क्रासींग, वसंतनगर, पुनाटोली, पाल चौक, रामनगर, बलमाटोला, दासगाव बु., बिरसी, ढाकणी, लोधीटोला, चुटीया, रापेवाडा, पांगडी येथे सोमवारी आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने भाजप शहरध्यक्ष सुनील केलनका, नंदू बिसेन, दीपक कदम, पंकज यादव, कल्लू यादव, कान्हा यादव, प्रकाश रहमतकर, अशोक चौधरी, चमनलाल बिसेन, रमेश अंबुले, विजय लोणारे, स्रेहा गौतम, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.गोपालदास अग्रवाल म्हणाले, गोंदिया विधानसभा क्षेत्रातील जनतेला केवळ विकास हवा आहे. त्यामुळेच या क्षेत्रातील जनतेने आपल्यावर मागील पंधरा वर्षांपासून विश्वास कायम ठेवला आहे. तोच विश्वास यापुढेही कायम ठेवून विकासाच्या मुद्दावर साथ देण्याची गरज आहे. लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद कायम राहिल्यास गोंदिया विधानसभा क्षेत्रातील विकासाचा रथ कुणीही थांबवू शकणार आहे. जोपर्यंत या क्षेत्रातील सर्व समस्या दूर होणार नाही तोपर्यंत आपले कार्य सुरुच राहील असे सांगितले. नेतराम कटरे म्हणाले काही ठेकेदार भ्रष्टाचाराचा पैसा लावून लोकप्रतिनिधी होण्याचे स्वप्न पाहत आहे.मात्र त्यांना जनताच धडा शिकविणार असल्याचे सांगितले. पदयात्रा आणि प्रचारसभांच्या माध्यमातून गोपालदास अग्रवाल यांनी जनतेशी संवाद साधला. पदयात्रे दरम्यान त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

संजय टेंभरे यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
भाजपच्या विचारधारेवर विश्वास ठेवून माजी जिल्हा परिषद सदस्य व बळीराजा शेतकरी संघाचे जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे यांनी रविवारी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी आमदार खोमेश रहांगडाले, नगराध्यक्ष अशोक इंगळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नेतराम कटरे, प्रफुल अग्रवाल, अमृत इंगळे उपस्थित होते.

Web Title: Maharashtra Election 2019 : Representation of the people and the ideology of the government are a must

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.