Maharashtra Election 2019 ; घोषणाबाज सरकारला जनताच धडा शिकविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 06:00 AM2019-10-17T06:00:00+5:302019-10-17T06:00:32+5:30

निवडणूक प्रचारार्थ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव, माहुरकुडा जि.प.क्षेत्रात बुधवारी आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने भागवत नाकाडे,आनंद जांभुळकर, गिरीश पालीवाल, यशवंत गणविर, आर.के.जांभुळकर, दीपक सोनवाने व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Maharashtra Election 2019 ; The public will teach the public a lesson to the public | Maharashtra Election 2019 ; घोषणाबाज सरकारला जनताच धडा शिकविणार

Maharashtra Election 2019 ; घोषणाबाज सरकारला जनताच धडा शिकविणार

Next
ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : महागाव, माहुरकुडा जि.प.क्षेत्रात प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : खोटेही बोलायचे मात्र ते सुध्दा रेटून बोलायचे असेच धोरण भाजप सरकारचे आहे. पाच वर्षांपूर्वी सत्तेवर येण्यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारने आम्ही सत्तेवर आल्यास जनतेच्या मनातील भारत साकारु असे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु, महागाई आटोक्यात आणू अशा मोठा मोठा घोषणा केल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात चित्र याविरुध्द चित्र आहे. मागील पाच वर्षांत केवळ घोषणांचाच पाऊस पडला बाकी काहीच झाले नाही. त्यामुळे घोषणाबाज सरकारला जनताच आता मतपेटीतून धडा शिकविणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.
निवडणूक प्रचारार्थ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव, माहुरकुडा जि.प.क्षेत्रात बुधवारी आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने भागवत नाकाडे,आनंद जांभुळकर, गिरीश पालीवाल, यशवंत गणविर, आर.के.जांभुळकर, दीपक सोनवाने व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. मनोहर चंद्रिकापुरे म्हणाले, विकासाच्या नावावर थापा मारणाऱ्या भाजप सरकारने मागील पाच वर्षांत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात कोणती विकास कामे केली ते सांगावे.केवळ नाल्याबांधून विकास होत नाही. तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्जुनी येथे राईस पार्क स्थापन करण्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणा सुध्दा हवतेच विरली. सत्तेवर येण्यापूर्वी धानाला ३ हजार रुपये प्रती क्विंटल हमीभाव देऊ अशी घोषणा केली होती. मात्र सत्तेवर येताच या घोषणेचा सुध्दा भाजप सरकारला विसर पडला. तर लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकार सत्तेवर येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीभाव दिला. यावरुन घोषणबाजी करणारे कोण आणि शेतकºयांचे हितेशी कोण हे जनतेने चांगले ओळखले आहे. तर कोट्यवधी रुपयांच्या महामार्ग तयार करण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.मात्र त्या कामांना सुध्दा अद्यापही सुरूवात झाली नाही.
मागील दहा वर्षांत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा विकास पूर्णपणे खुंटला आहे.तर शेतकरी, शेतमजूर,कामगार आणि सर्वसामान्य नागरिक सुध्दा खूश नाही.या क्षेत्रात बेरोजगारांच्या हाताला काम मिळत नसल्याने त्यांना रोजगाराच्या शोधात भटकंती करावी लागत आहे.आरोग्य, शिक्षण या क्षेत्राची स्थिती सुध्दा जैसे थे आहे.भाजप लोकप्रतिनिधीच्या नेतृत्त्वात या विधानसभा क्षेत्रात एकही उल्लेखनिय काम झाले नसल्याचा आरोप चंद्रिकापूरे यांनी केला. या क्षेत्राचा कायापालट आणि विकास केवळ आघाडी सरकारच करु शकते असे सांगत यासाठी जनतेची साथ हवी असल्याचे सांगितले.

Web Title: Maharashtra Election 2019 ; The public will teach the public a lesson to the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.