Maharashtra Election 2019 ; Election 'fever' is increasing in all four constituencies | Maharashtra Election 2019 ; चारही मतदारसंघात वाढतोय इलेक्शन ‘फिव्हर’
Maharashtra Election 2019 ; चारही मतदारसंघात वाढतोय इलेक्शन ‘फिव्हर’

ठळक मुद्देसंडे अँकर ।उमेदवारांच्या मागे मोठा फौजफाटा, लक्ष केंद्रीत करण्यासाठी नवीन फंडे

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील चारही मतदारसंघात ९ सप्टेंबरपासून प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रचाराला वेग आला आहे. प्रचारासाठी आता मोजके सात दिवस शिल्लक असल्याने पदयात्रा,रोड शो, कार्नर सभांच्या माध्यमातून उमेदवार अधिकाधिक उमेदवारांमपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे चारही मतदारसंघात इलेक्शन फिव्हर वाढत असल्याचे चित्र आहे.
प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार जोरकस प्रचाराला लागले आहेत. उमेदवारी न मिळालेले अनेकजण समर्थक उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. यामुळे चारही मतदारसंघांत निवडणूक ज्वर तापला आहे. विजयादशमीनंतर खऱ्या अर्थाने राजकारणाचे रण पेटले.
परस्परांवर टीका,आक्षेप नोंदविले जात आहेत. कुणी विकास कामांचा पाढा वाचत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे, तर पाटी कोरी असलेले उमेदवार आश्वासनांची खैरात वाटत आहेत. यंदा आमदारकी मिळवायचीच, या इच्छेने पेटलेल्या उमेदवारांनी सर्वस्व पणाला लावले आहे.

सोशल मीडियावर कार्यकर्ते सक्रीय
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांचे कार्यकर्ते सोशल मीडियावरही प्रचार पत्रकाबरोबर प्रचारातील अपडेट फोटो व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक अशा माध्यमांवर टाकून एकाच वेळी अनेक मतदारांपर्यत पोहचिवण्याची व्यवस्था करीत आहेत, हायटेक प्रचार यंत्रणेवर उमेदवारांसह कार्यकर्तेही पसंती देत आहेत.
मतदार यांद्यावर लक्ष
मतदारसंघात येणाºया गावांची नावे नक्की केल्यानंतर मतदार यादीची पडताळणी व त्यानंतर कुणाची नावे आहेत, कुणाची नाहीत, याचा शोध उमेदवारांच्या प्रचार कार्यालयात जबाबदार पदाधिकारी घेत आहेत. त्यानुसार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन केले जात आहे. विशेष म्हणजे, एकगठ्ठा मते विविध प्रकारच्या माध्यमातून आपल्याकडे वळविण्यासाठी उमेदवारांनी पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न चालविले आहेत. याकिरता निकटवर्तीयांचीही मदत उमेदवारांकडून घेतली जात असल्याचे चित्र विविध मतदारसंघामध्ये दिसत येत आहे.
अनेकांचा प्रचारात सहभाग
विधानसभा निवडणूक जसजसी जवळ येत आहे, तसतसे पक्षांचे कार्यकर्ते,पदाधिकारी उमेदवारांचे विविध घटकही प्रचारात सहभागी होत आहेत. यामध्ये महिला मंडळ, बचत गट, युवक मंडळ, किरकोळ व्यावसायीक व अन्य मंडळी आपापल्या उमेदवारांना पाठींबा देऊन प्रचाराची जबाबदारी सांभाळत आहेत. यामुळे प्रचार कार्यालयातही गर्दी वाढत असल्याचे चित्र मतदारसंघामध्ये दिसून येत आहे.
कुटुंबीयांची प्रचारात उडी
प्रचार कार्यात उमेदवारांच्या कुटुंबीयांसह निकटवर्तीय, विविध संस्थांचा कर्मचारी वर्गही सक्रि य झाला आहे. मतदार याद्यांची गावनिहाय जबाबदारी त्यांच्यावर निश्चित केली आहे. घरोघरी जाऊन मतदारांची प्रत्यक्ष भेट व प्रचारावर प्रत्येकाचा भर आहे.


Web Title: Maharashtra Election 2019 ; Election 'fever' is increasing in all four constituencies
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.