महाबीजचे बियाणे निकृष्ट दर्जाचे
By Admin | Updated: October 20, 2015 02:34 IST2015-10-20T02:34:19+5:302015-10-20T02:34:19+5:30
महाबीज कंपनीच्या धान पिकांचे बियाणे निकृष्ट दर्जाची निघाल्याने शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे

महाबीजचे बियाणे निकृष्ट दर्जाचे
कालीमाटी : महाबीज कंपनीच्या धान पिकांचे बियाणे निकृष्ट दर्जाची निघाल्याने शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.
आमगाव तालुक्यातील सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीमधून शेतकरी विविध जातीचे कडधान्य किंवा बियाणे विकत घेतात. सदर ठिकाणाहून महाबीज कंपनीची रोगमुक्त व दर्जेदार बियाणे उपलब्ध शासनस्तरावर होते. पण दिवसेंदिवस सदर कंपनीची बियाणे निकृष्ट दर्जाचे येत असल्याचे पुरावे शेतकऱ्यांनी सबंधीत विभागाला दिले आहे.
बनगाव येथील शेतकरी बाळकृष्ण काशीराम शिवणकर यांनी दि. १२ जून रोजी तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीतून एम.टीयु रुपये २०७०, समामासुरी ५० किलो रु. १२५० प्रमाणे धानाचे बियाणे खरेदी केले. शिवणकर यांनी संबा मासुरी शेतात लागवड केली पण धानाचे दाणे आल्या नंतर धानाच्या गर्भाची वाढ झाली नाही. त्यामुळे शेतातील ७० ते ८० टक्के धान पीाक रोगग्रस्त झाले.
सदर शेतकऱ्यांचे शेत किंडगीपार येथील गट क्रमांक ६२२/१, ६२३/२ असून क्षेत्रफळ दोन ते अडीच एकर जमिनीतील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. सुपलीपार येथील कपुरा चौधरी यांच्या शेतातील लवकी या पिकावर परिणाम दिसून आले आहे.
सितेपार येथील शेतकरी चौधरी यांनी शेतात फवारणी केल्यावर संपूर्ण शेत जळून गेल्याचे निदर्शनात आले आहे. परिसरातील किंडगीपार, सुपलीपार, कालीमाटी, बनगाव, सितेपार इतर गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे किंवा औषधी निकृष्ट दर्जाच्या असल्याची तक्रार आहे.
सदर पिकांची पाहणी जि.प. सदस्य सुखराम फुंडे, भूवन चुटे यांनी केली. सदर मुद्दा फुंडे यांनी जि.प.च्या सभेत मांडणार व शेतकऱ्याना मोबदला मिळावा म्हणून शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. (वार्ताहर)
शेतकऱ्यांच्या तक्रारी येत असून बनगाव, सितेपार, सुपलीपार येथे प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे. पिकांचे नमूने व सविस्तर माहिती वरिष्ठांना देण्यात आली आहे. या समस्येकरिता शासनस्तरावर पथक तयार करण्यात आले. कारवाईचे योग्य निर्देश दिले आहे.’
जी.एम.रहांगडाले
तालुका कृषी अधिकारी पं.स. आमगाव