श्रीरामनगरला मधाचा गोडवा

By Admin | Updated: April 7, 2017 01:33 IST2017-04-07T01:33:43+5:302017-04-07T01:33:43+5:30

वन विभाग व राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या संयुक्त वतीने सडक-अर्जुनी तालुक्यातील श्रीरामनगर या पुनर्वसीत गावातील

Madam's sweetness to Shri Ramnagar | श्रीरामनगरला मधाचा गोडवा

श्रीरामनगरला मधाचा गोडवा

मध संकलनातून रोजगार : वन विभागाने दिले २५ लाभार्थ्यांना प्रशिक्षण
गोंदिया : वन विभाग व राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या संयुक्त वतीने सडक-अर्जुनी तालुक्यातील श्रीरामनगर या पुनर्वसीत गावातील २५ आदिवासी लाभार्थ्यांना पाच दिवसाचे मधमाशी पालन उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात आले.
जिल्ह्यात जंगलक्षेत्र जास्त असल्याने नैसर्गीक आग्यामाशांचे प्रमाण जास्त आहे. आदिवासी लोक आग्या जाळून मध काढत असल्याने निसर्गातील मधमाशा मोठ्या प्रमाणावर नष्ट झालेल्या आहेत. त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. त्याचा परिणाम शेती उत्पादनावर व जंगलातील झाडांपासून मिळणाऱ्या उत्पन्नावरही होत आहे. त्यामुळे आदिवासींना आग्यापोळ्यातील मधमाशा न जाळता शास्त्रोक्त पध्दतीने मध संकलन कसे करावे याबाबतचे प्रशिक्षण यामध्ये देण्यात आले.
संरक्षक ड्रेस व मध काढण्यासाठी इतर साहित्यांचा वापर करून आग्यापोळ्यातून मध काढता येणार आहे. आदिवासींनी गोळा केलेल्या मधाच्या विक्र ीतून आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. अमरावती जिल्ह्यात चिखलदरा येथे नुकतेच मध संकलन व प्रक्रीया केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे गोळा होणाऱ्या मध खरेदीची सोय मंडळामार्फत केली जाणार आहे. यामुळे आदिवासींना कायमस्वरु पी रोजगाराची संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे.
तसेच देवरी तालुक्यातील गडेगाव परिसरातील २० आदिवासी लाभार्थींनाही मध उद्योगाचे प्रशिक्षण चालू वर्षात देण्यात आले आहे. त्यांनाही आग्यामाशांच्या पोळ््यातून मध काढण्यासाठी साहित्य पुरविण्यात आले. मेळघाट येथून तज्ज्ञ व्यक्तींना बोलावून गडेगाव येथे आग्या पोळ््यापासून मध काढण्याचे प्रात्यक्षिक दाखिवण्यात आले.
जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त झालेल्या निधीतून ४५ आदिवासी लाभार्थींना सदर प्रशिक्षणाचा लाभ देण्यात आला असून त्यांना आवश्यक त्या साहित्याचे वाटपही करण्यात आले. उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर व जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी आर.ए.बुचडे यांच्या मार्गदर्शनात मधुक्षेत्रिक मुलकलवार, नागपूरचे मध संशोधन अधिकारी नारायणकर, सडक/अर्जुनी वनपरिक्षेत्राधिकारी राठोड, सहायक वनक्षेत्राधिकारी खांडेकर, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश रहिले, वनरक्षक तिरपुडे आदींच्या सहकार्याने प्रशिक्षण कार्यक्र म घेण्यात आला.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Madam's sweetness to Shri Ramnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.