बचत गटांना मशीनचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2016 02:16 IST2016-06-01T02:16:55+5:302016-06-01T02:16:55+5:30

बचतगटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार करण्याची संधी विविध मार्गाने महिलांना मिळत आहे.

Machine base for saving groups | बचत गटांना मशीनचा आधार

बचत गटांना मशीनचा आधार

अगरबत्ती उत्पादन : दिवसभरात बनवताहेत ६० ते ७० किलो अगरबत्त्या
काचेवानी : बचतगटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार करण्याची संधी विविध मार्गाने महिलांना मिळत आहे. यातूनच बचतगटाच्या कर्जातून काही महिलांनी अगरबत्ती तयार करण्याची मशीन घेवून आपला स्वयंरोजगार सुरू केला आहे.
बरबसपुरा येथील बचतगटाला बँकेने साडे तीन लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यातून सरपंच ममता यादोराव लिचडे यांनी अगरबत्ती तयार करण्याची मशीन घेवून स्वयंरोजगाराची सुरुवात केली आहे. एक लाख २५ हजार रुपयंची मशीन आणि २५ हजारांचे इतर साहित्य असे एकूण दीड लाख रुपये मशीनसाठी लागले. वीजेवर चालणाऱ्या या मशीनवर १२ तास नियमीत अगरबत्ती बनविण्याचे काम केले तर ५० ते ६० किलो उत्पन्न काढल्या जाऊ शकते. कंपनी ७० किलो उत्पन्न देत असल्याचे सांगते. मात्र आपण इतके उत्पन्न काढले नसल्याचे लोकमतशी बोलताना त्यांनी सांगितले.
अगरबत्ती तयार करण्याकरिता लागणारे साहित्य महाग असल्याने पाहिजे तसा लाभ मिळताना दिसत नाही. लागणाऱ्या काड्या ११५ रु. किलो, मसाला ३५ रु. किलो आणि चिकी (गोंद) ४० रुपये किलो बाजारातून घ्यावे लागते. एक किलो अगरबत्ती तयार करण्याकरिता ४० रुपये खर्च येत असून बाजारात विक्री करताना ५६ रुपये किलो प्रमाणे देण्यात येते. एका किलोमागे १५ ते १७ रुपये आपल्याला मिळत असल्याचे लिचडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
बचत गटाला ही मशीन नाबार्ड योजनेमधून देण्यात आली असून घेतलेले कर्ज दोन वर्षात चुकते करायचे आहेत. नियमित कांड्या तयार करण्याचे काम केले तर हे व्यवसाय परवडण्यासारखे आहे. हाताळतांना यावेळी थोडाफार त्रास होत असल्याने पाहिजे तसे उत्पन्न काढता येत नाही. तरीपण बँकेची किश्त भरुन आपला घर खर्च भागतो असेही लिचडे यांनी सांगितले. बरबसपूरा येथील सुनील चौधरी यांनी सुद्धा अगरबत्ती तयार करण्याचे यंत्र आणल्याने हाताने अगरबत्ती तयार करताना दिवसाला २५ ते ३० रुपये रोजी मिळत नव्हती. ती याद्वारे आपल्याला परवडणारी असल्याचे सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Machine base for saving groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.