एम. बी. पटेल महाविद्यालयाचे चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:21 IST2021-07-15T04:21:04+5:302021-07-15T04:21:04+5:30

सालेकसा : आदिवासी, नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील असलेल्या तालुक्यातील मनोहरभाई पटेल कला व वाणिज्य महाविद्यालयातील एम. ए. इतिहास विषयात ४ विद्यार्थी ...

M. B. Four students of Patel College in merit list | एम. बी. पटेल महाविद्यालयाचे चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत

एम. बी. पटेल महाविद्यालयाचे चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत

सालेकसा : आदिवासी, नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील असलेल्या तालुक्यातील मनोहरभाई पटेल कला व वाणिज्य महाविद्यालयातील एम. ए. इतिहास विषयात ४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेले आहेत. रातुम नागपूर विद्यापीठ, नागपूरद्वारे इतिहास विषयाच्या घोषित झालेल्या यादीत प्रथम मेरिट रितेशकुमार भवरलाल राऊत हा विद्यार्थी आहे. द्वितीय मेरिट याच महाविद्यालयाचा क्रिष्णकुमार अर्पण पिहिदे आलेला आहे. सहावी मेरिट रिना गोवर्धन लिल्हारे असून, दहावा मेरिट नंदकिशोर चैनसिंग नागपुरे आलेला आहे.

रितेश राऊत याला स्व. वसंत अच्युट टिके सुवर्ण पदक, तात्या टोपे स्मृती सुवर्ण पदक व स्व. सहदेव सखाराम रामटेके रौप्य पदक मिळालेले असून, कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव राजू हिवसे, परीक्षा संचालक प्रफुल साबळे यांच्या हस्ते दीक्षांत सभारंभात प्रदान करण्यात आले. गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ललीत जीवानी, इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. नामदेव हटवार, डॉ. बाबुसिंग राठोड, डॉ. रामकिशन लिल्हारे, प्रा. योगराज थेर व आई-वडिलांना दिले आहे.

Web Title: M. B. Four students of Patel College in merit list