काकूच्या मृत शरीरावर शमविली वासना
By Admin | Updated: August 22, 2015 00:11 IST2015-08-22T00:11:35+5:302015-08-22T00:11:35+5:30
डब्बेटोला येथील एका महिलेचे मुंडके धडापासून वेगळे करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना गेल्या १७ जुलै रोजी घडली होती.

काकूच्या मृत शरीरावर शमविली वासना
पुतण्याची कबुली : डब्बेटोला येथील हत्येतील आणखी एक सत्य बाहेर
काचेवानी : डब्बेटोला येथील एका महिलेचे मुंडके धडापासून वेगळे करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना गेल्या १७ जुलै रोजी घडली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, पोलिसांच्या तपासात ही हत्या मृतक महिलेच्या पुतण्यानेच केल्याचे उघड झाले. आता सदर आरोपीने खळबळजनक कबुलीजबाब देत काकूची हत्या केल्यानंतर तिच्या मृत शरीरावर आपली वासना शमविल्याची कबुली दिली.
या प्रकरणातील आरोपी ऋषिपाल केवट याच्याकडून सदर घटनेतील असे एकेक खुलासे समोर येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी दिली.
सदर प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपी ऋषिपाल, त्याचे वडील व इतर चार-पाच जण उपस्थित होते. मात्र ठाणेदार कदम यांनी ऋषिपालच्या हावभावावरून सदर प्रकरणाचा उलगडा करण्यात यश मिळविले. कदम यांनी सांगितले की, आईच्या वागणुकीचा दुष्परिणाम मुलीवर होऊ नये यासाठीच आपण काकूची हत्या केली, असे आरोपी ऋषिपाल सांगत असला तरी केवळ यामुळेच एवढे भयानक हत्याकांड होणे, हे न उलगडणारे कोडे होते. त्यामुळे पोलीस खाक्या दाखविल्यावर ऋषिपालने पुढील घटनाक्रमही सांगितला. हत्या केल्यावर मृत काकूच्या शरीरावर वासना भागविल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
गंगाझरीचे पोलीस निरीक्षक कदम व तिरोड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, मृत महिला आपल्या प्रियकरासह बोलत असताना आरोपी ऋषिपाल त्यांच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचा, परंतु प्रियकराला विचारल्यावर त्याच्या हावभावात वेगळाच बदल दिसून येत होता. दोन दिवसाच्या तपासात आरोपीने कबुली दिली नव्हती. परंतु त्याची नजर, हालचाल व हावभावावरून आपल्याला पूर्वीपासूनच शंका होती. इतर व्यक्तींप्रमाणे आरोपीसुद्धा सामान्य स्थितीत असता तर हे प्रकरण उघड करणे कठीण झाले असते. परंतु त्याच्या मित्राच्या मोबाईलवरील मिस कॉल व वार्तालापामुळे गुन्हा उघड करण्यात यश आल्याचे कदम यांनी सांगितले. (वार्ताहर)