शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

हृदयघात, उच्च रक्तदाब व मधूमेहाचे प्रमाण कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली आहे. घराबाहेर कुणी पडायचे नसून त्यामुळे बाहेर खाण्याचे प्रमाण १०० टक्के बंद झाले. वेळेवर औषध व घरातील शुद्ध आहार लोकांना मिळू लागला व त्यामुळे हृदयरोगाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यात या रूग्णांचे प्रमाण कमी दिसण्याची दुसरी बाजू म्हणजे बरेचशे रूग्ण त्रास असूनही बाहेर पडत नाहीत.

ठळक मुद्देआनंदायी वातावरणामुळे बदल : कुटुुंबीयांसोबत योग्य आहार घेण्याचा फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मागील महिनाभरापासून घरातच असलेल्या लोकांना आनंददायी वातावरण व तणावापासून मुक्ती मिळाल्याने या काळात हृदयघात, उच्च रक्तदाब व मधूमेहाचे प्रमाण कमी झाल्याचे वास्तव पुढे आले आहे. कुटुंबीयांसोबत घरातीलच योग्य आहाराचे सेवन होत असल्यामुळे या आजारांत मोठ्या प्रमाणात घट दिसून येत आहे, अशी माहिती हृदयविकार तज्ज्ञ डॉ. प्रमेश गायधने यांनी दिली आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली आहे. घराबाहेर कुणी पडायचे नसून त्यामुळे बाहेर खाण्याचे प्रमाण १०० टक्के बंद झाले. वेळेवर औषध व घरातील शुद्ध आहार लोकांना मिळू लागला व त्यामुळे हृदयरोगाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यात या रूग्णांचे प्रमाण कमी दिसण्याची दुसरी बाजू म्हणजे बरेचशे रूग्ण त्रास असूनही बाहेर पडत नाहीत.बराचशा रूग्णांचे आनंददायी जीवन (हॅपीनेस इंडेक्स) वाढल्यामुळे ताण कमी झाला आहे. शिवाय, उच्च रक्तदाब व मधूमेहाचे प्रमाण बरेच कमी झाले आहे.‘लॉकडाऊन’च्या काळात अनेक जणांच्या तपासण्या व निदानही कमी झाल्यामुळे रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी दिसून येत आहे. श्वसनाच्या (फुफुस) त्रासामुळे रूग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. काही रूग्ण रक्ताची गाठ झाल्यामुळे तर काही सरळ इन्फेक्शनमुळे कमजोर हृदय घेऊन दाखल होत आहेत.काळजी घेऊन आपण कोरोनावर मात करू शकतो यासाठी नियमांचे पालन करावे, असे डॉ. प्रमेश गायधने यांनी सांगीतले.हृदयरोगींना कोरोनाचा धोका जास्तहृदयरोगींना कोरोनाचा धोका दुसऱ्यांपेक्षा जास्त असतो. मात्र काळजी व प्रतिबंधात्मक उपायांनी कोरोनाचा टाळला जाऊ शकतो. जुन्या रूग्णांनी हृदयरोगाचा उपचार सुरू ठेवावा व त्यात असलेल्या बदलासाठी डॉक्टरांना फोन लाऊन विचारावे. खूप जास्त त्रास असल्यावरच घर सोडून हॉस्पीटलमध्ये जावे. हृदयरोगींनी औषधींचे ब्रांड बदलू नये याची काळजी घ्यावी. तसे झाल्यास सारख्या मात्रांच्या दुसºया कंपनीची औषधी घेऊ शकतात. फक्त रक्त पातळ करण्याचे औषध बदलता कामा नये. एन्जीओप्लास्टी (स्टेंट) व बायपास झाल्यास रूग्णाने औषध न बदलता सुरू ठेवणे. नियमीत एन्जीओप्लास्टी व एन्जीओग्राफी टाळता येते. छातीत जास्त त्रास्त असल्यास लवकर उपचार करवून घ्यावे. हृदयरोगींना २४ तास ७ दिवस उपचार उपलब्ध आहे.व्यसनापासून दूर रहारूग्णांनी रक्तदाब व मधूमेह रिडींग डॉक्टरांना फोनवर सांगावे. डायलीसीस रूग्णाने किडनीतज्ज्ञांना विचारून डायलीसीस सुरु ठेवावे किंवा पुढे ढकलावे व हृदयरोगींनी उपचार सुरू ठेवावा. हृदयनिकामी झालेल्या रूग्णांनी थोडा व्यायाम सुरू ठेवावा. खाण्यापिण्यात काळजी घ्यावी. सर्व नियमीत शस्त्रक्रिया टाळाव्यात. ‘लॉकडाऊन’मध्ये घरी सिगारेट टाळावेत. सगळ्यांना तंबाखूच्या धुरापासून दूर ठेवावे. दारू टाळावी, दारूची सवय असल्यास मानसोपचार तज्ज्ञांकडून मदत घ्यावी. लहान मुलांच्या हृदयरोगांची शस्त्रक्रिया असल्यास तज्ज्ञांना विचारावे.वाफरीन, असिट्रोम, डॉबीगाट्रान आधी औषधांचा उपचार सुरू असलेल्या रूग्णांनी जूनी आयएनआर रक्त तपासणी डॉक्टरांशी संवाद करून सुरु ठेवणे किंवा बदलावे. कोरोनामध्ये पैशांचा तुटवडा असल्यास हृदय तज्ज्ञांना सांगून स्वस्त औषध करून घेणे, रक्तदाब, मधूमेह यांचा उपचार तसाच सुरू ठेवावा. काही गोष्टीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.-डॉ. प्रमेश गायधनेहृदयविकार रोगतज्ज्ञ गोंदिया.

टॅग्स :Healthआरोग्य