शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

प्रतापगडावर लोटला भक्तांचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:47 PM

हिंदू-मुस्लीम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या प्रतापगडावर महाशिवरात्री पर्वावर लाखों भाविकांनी मंगळवारी (दि.१३) दर्शन घेतले. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आबालवृध्द महिला पुरुष, युवक-युवती व बालकांनी ‘महादेवा जातो गा’ चा गजर करीत गर्दी केली होती.

ठळक मुद्देविदर्भातील भाविकांची हजेरी : विविध संघटनांतर्फे महाप्रसादाचे वितरण, लोकप्रतिनिधींची हजेरी, पाच दिवस चालणार यात्रा

ऑनलाईन लोकमतअर्जुनी-मोरगाव : हिंदू-मुस्लीम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या प्रतापगडावर महाशिवरात्री पर्वावर लाखों भाविकांनी मंगळवारी (दि.१३) दर्शन घेतले. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आबालवृध्द महिला पुरुष, युवक-युवती व बालकांनी ‘महादेवा जातो गा’ चा गजर करीत गर्दी केली होती. ही यात्रा पाच दिवस चालणार असल्याने येथील गर्दीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.महाशिवरात्री पर्वावर गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे मोठी यात्रा भरते. मांगल्य जपणारा, आनंद देणारा व बंधूभाव वाढविणाऱ्या या उत्सवाला येथे अत्याधिक महत्व व श्रध्दा आहे. हिंदू समाजबांधव महादेव पहाडीवर तर मुस्लिम बांधव ख्वाजा उस्मान गनी हारुनी बाबांचे मोठ्या भक्तीभावाने दर्शन घेतात. हातात त्रिशूल व मुखात महादेवा जातो गा असा गजर करीत सोमवारपासूनच भाविकांनी येथे गर्दी केली होती. यावर्षी यात्रेवर निसर्ग कोपला, वादळी पाऊस व गारपिटीची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्यामुळे व वातावरण ढगाळ असल्याने यात्रेपूर्वी होणाऱ्या गर्दीत भाविकांच्या संख्येत थोडीफार घट झाल्याचे चित्र होते. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रशासनाने यात्रास्थळी वाहतुकीवर निर्बंध घातल्याने वाहनांची गर्दी कमी होती मात्र गावाबाहेर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. प्रतापगड गावाच्या सभोवताल तीन ठिकाणी गावाबाहेरच वाहतूक अडविण्यात आली होती. एस. टी. महामंडळाच्या बसेस व इतर वाहने लांब अंतरावर थांबविण्यात आल्याने भाविकांना बरीच पायपीट करावी लागली. प्रतापगड येथील समाज मंदिरालगत खा. प्रफुल पटेल यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. माजी खा. नाना पटोले यांनी या स्थळापासून सुमारे एक कि.मी अंतरावर भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली होती. महाप्रसादांच्या ठिकाणी ध्वनी प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावरुन भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन केले जात होते. महादेवाची गाणी उद्घोषकांद्वारे वारंवार कानावर ऐकू येत होत्या. अगदी सुरुवातीपासून तर दर्शन घेईपर्यंत केवळ ध्वनी कल्लोळच ऐकू येत होता. काही भाविकांनी या प्रसंगाला राजकीय स्पर्धा ही बिरुदावली दिली.चोख बंदोबस्त आणि सुविधापोलीस प्रशासनाच्या वतीने कालीमाटी-प्रतापगड, कढोली-प्रतापगड व तिबेट कॅम्प-प्रतापगड मार्गावर गावाच्या सीमेबाहेर वाहने थांबविण्यात आल्याने भाविकांची थोडीफार गैरसोय झाली. मात्र सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा योग्य निर्णय होता. यावेळी भक्तनिवासानजीक स्त्री-पुरुषांकरीता स्वतंत्र सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. शौचालयाची स्वच्छता व पाण्याच्या सुविधेसाठी येथे एका व्यक्तीची नेमणूक करण्यात आली होती. तसेच ठिकठिकाणी तात्पुरत्या मुतारींची व्यवस्था करण्यात आली होती.ग्रामपंचायतकडून सोईसुविधाभाविक रस्त्यावर नारळ फोडतात. कवच तसेच रस्त्यावर फेकतात ते इतर भाविकांच्या त्रासदायक ठरुन इजा होऊ नये, तसेच अगरबत्ती, बेल, फुल व कापूर जाळण्यासाठी ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनातर्फे पहिली पायरी व वरच्या मंदिरात देवकुंडाची व्यवस्था करण्यात आली होती. वरच्या मंदिरात दर्शन घेणारे व दर्शन घेऊन परत येणाºयांसाठी स्वतंत्र मार्गाची व्यवस्था करण्यात आली होती.बळीराजात नवचैतन्य येऊ दे- पटोलेओला तर कधी कोरडा दुष्काळ त्यातही पिकावरील कीड शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पूजली आहे. वरुणराजाने संतुलीत बरसून शेतकऱ्यांना सुखसमृध्दी, नवचैतन्य लाभो असे साकडे घातले. त्यांनी पहाडीवरील शिवमंदिरात जाऊन दर्शन घेऊन अभिषेक केला. दुष्काळाने कासाविस झालेल्या बळीराजाच्या शुष्क चेहऱ्यावर मायेच्या ओलाव्याचा शिडकावा करण्याचे धारिष्टय शासनात येऊ देण्याची सदबुध्दी देण्याची आर्जव माजी खा. नाना पटोले यांनी केली.उर्स शरीफचे आयोजन आजराष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या प्रतापगड येथील हजरत ख्वाजा उस्मान गनी हारुनी बाबांच्या दर्ग्यावर मुस्लिम बांधव मोठ्या श्रध्देने गर्दी करतात. बुधवारी ५२ व्या उर्स शरीफनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी शाही संदल काढण्यात येणार आहे. विविध धर्माचे मान्यवर व भावीक दर्ग्यावर चादर चढविणार आहेत. गुरुवारी रात्री ९ वाजता बंगलोर येथील प्रख्यात कव्वाल मुराद आतिश व मुंबईचे दानिश इकबाल साबरी यांची कव्वाली होणार आहे.जनतेच्या मांगल्याचे मागणेमनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांनी प्रतापगडला भेट देवून खालच्या शिवमंदिरात दर्शन घेतले.तसेच आपल्या परिसरातील जनतेच्या मांगल्याचे मागणे घातले. यावेळी त्यांचेसोबत निखील जैन, मनोहरराव चंद्रिकापुरे, राजू जैन व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्याठिकाणी उपस्थित भाविकांच्या अडीअडचणी जाणून त्यांनी संवाद साधला. महाप्रसाद शामियानात त्यांनी भक्तजणांना महाप्रसाद वितरीत केला.आरोग्य शिबिराची व्यवस्थाआरोग्य विभागाच्या वतीने भाविकांच्या आरोग्य तपासणीसाठी ८ ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राऊत यांचे देखरेखीखाली आरोग्य तपासणी केंद्र व रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली. ठिकठिकाणी पेयजल व्यवस्था तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी तालुका प्रशासनातर्फे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली. एस.टी. महामंडळाच्या भंडारा, साकोली, गोंदिया व तिरोडा बसस्थानकावरुन भाविकांची वाहतूक सुविधा करुन देण्यात आली होती. त्यामुळे येथे येणाºया भाविकांची सोय झाली.