२५ टक्के प्रवेशासाठी ‘लॉटरी सिस्टिम’

By Admin | Updated: May 16, 2016 01:56 IST2016-05-16T01:56:29+5:302016-05-16T01:56:29+5:30

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील मुलांना सर्व माध्यमाच्या ...

'Lottery System' for 25% Admission | २५ टक्के प्रवेशासाठी ‘लॉटरी सिस्टिम’

२५ टक्के प्रवेशासाठी ‘लॉटरी सिस्टिम’

आज होणार निवड : शिक्षक व पालकांची कार्यशाळा
गोंदिया : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील मुलांना सर्व माध्यमाच्या विनाअनुदानित प्राथमिक शाळांत २५ टक्के मोफत प्रवेशाची तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत सोमवारी (दि.१६) प्रवेशाकरिता लॉटरी सिस्टिमने निवड केली जाणार आहे.
मोफत व सक्तीचा अधिकारांतर्गत वंचीत व दुर्बल घटकांतील मुलांना वर्ग १ किंवा पूर्व प्राथमिक स्तर आहे अशा विनाअनुदानित प्राथमिक शाळांत २५ टक्के प्रवेशाची तरतूद आहे. यात अल्पसंख्यक धार्मिक शाळांना वगळण्यात आले आहे. २५ टक्के प्रवेशासाठी वंचित गटांतर्गत अनु.जाती, अनु.जमाती व सर्व जाती धर्मातील दिव्यांग, दुर्बल घटक तसेच खुल्या प्रवर्गासह, विमुक्त जाती व भटक्या जमातीस इतर मागास वर्ग, विशेष मागास वर्ग व धार्मिक अल्पसंख्यक बालके पात्र राहणार आहेत. यासाठी कु टूंबाचे एकत्रीत वार्षिक उत्पन्न एक लाख रूपयांत असावे.
सत्र २०१६-१७ मध्ये या २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया पारदर्शी व्हावी यासाठी आॅनलाईन पद्धतीने प्रवेश देण्याचे शासनस्तरावरून निश्चित करण्यात आले आहे. त्याकरिता १२ एप्रिल ते ८ मेपर्यंत प्रवेश प्रक्रियेचे अर्ज भरण्यात आले आहेत. दरम्यान, २५ टक्के प्रवेशासाठी सोमवारी जिल्हा परिषद शिक्षण विभागात लॉटरी सिस्टिमने प्रवेश प्रक्रिया केली जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 'Lottery System' for 25% Admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.