गेल्यावर्षीच्या विद्यार्थिनींच्या सायकलींना खो

By Admin | Updated: July 26, 2016 01:36 IST2016-07-26T01:36:45+5:302016-07-26T01:36:45+5:30

ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना दळण-वळणाच्या साधनाअभावी शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये...

Lost last year's bicycle bicycles | गेल्यावर्षीच्या विद्यार्थिनींच्या सायकलींना खो

गेल्यावर्षीच्या विद्यार्थिनींच्या सायकलींना खो

पदाधिकाऱ्यांची उदासीनता : महिला बालकल्याण विभागाचा असाही नाकर्तेपणा
गोंदिया : ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना दळण-वळणाच्या साधनाअभावी शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये यासाठी शासनाने मानव विकास कार्यक्रम व जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत मुलींना सायकल देण्याची योजना सुरू केली. परंतु सत्र २०१५-१६ या शैक्षणिक सत्रातील एकाही लाभार्थी मुलीला जिल्हा परिषदेने सायकलचे वाटप केले नसल्याची माहिती पुढे आली आहे.
शाळेतपासून दोन किमी किंवा त्यापेक्षा अधिक अंतरावर राहणाऱ्या इयत्ता आठवी व नववीच्या मुलींना सायकल वाटप करण्यात येते. दरवर्षी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गातील मुलीांना शाळेत जाण्यास सोय व्हावी म्हणून शासनाने सायकल देणे सुरू केले. गोंदिया जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षी ५०० च्या घरातील विद्यार्थीनींना सायकल वाटप केले जाते. यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाला २० ते २१ लाख रूपयाचा निधी दिला जातो. या विभागाने सन २०१५-१५ या वर्षात अनुसूचित जातीच्या १३१ विद्यार्थीनींना ४ लाख ८५ हजाराच्या सायकल वाटप केल्या होत्या. अनुसूचित जमातीच्या १०४ विद्यार्थीनींना ३ लाख ८७ हजार रूपयाच्या सायकली तर सर्वसाधारण प्रवर्गातील २६२ मुलींना ९ लाख ७० हजाराच्या सायकली वाटप केल्या.
शासनाने २०१५-१६ या वर्षात ५०० च्या घरात असलेल्या लााभार्थ्यांसाठी २१ लाख रूपये शासनाने वर्षभरापासून या विभागाला दिले.
परंतु या विभागाच्या उदासिनतेमुळे दुसरे वर्ष लागूनही मुलींना सायकल देण्यात आल्या नाही. आता सत्र २०१६-१७ सुरू झाले असताना जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाकडे अद्याप सत्र २०१५-१६ चे नियोजन आहे. या विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे जिल्ह्यातील ५०० विद्यार्थीनी सायकलींपासून वंचीत आहे. (तालुका प्रतिनिधी)

जि.प. सदस्यांना हवेत आपले ‘कॅन्डीडेट’
जि.प. अंतर्गत देण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभासाठी पात्र उमेदवार सोडा, आधी माझ्या ‘कॅन्डीडेट’ चे नाव आले पाहिजे अशी भूमिका घेत अनेक जि.प.सदस्यांची चढाओढ सुरू असते. माझ्या मतदाराच्या कुटुंबियांना महिला व बाल कल्याण विभागातील योजनांचा लाभ मिळावा यासाठी अनेक जिल्हा परिषद सदस्यांच्या चकरा या विभागात होता. गरजू लाभार्थ्यांची यादी तालुक्यातील प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून येते. त्या यादीत नाव टाकण्यापासून तर जि.प.च्या कार्यालयात हे नाव यादीत यावे यासाठी प्रयत्न सुरू असते. सर्वसाछारण सभेनंतर मागच्या वर्षीच्या सायकल वाटण्याचा तोडगा निघणार आहे.

सन २०१५-१६ या वर्षाचे नियोजन आता सुरू आहे. यासाठी निधी उपलब्ध आहे. या सायकल वाटप झाल्यानंतर सन २०१६-१७ चे नियोजन करण्यात येईल.
-जे.एम. अंबादे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
महिला व बाल कल्याण, जि.प. गोंदिया

Web Title: Lost last year's bicycle bicycles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.