फटाके व्यवसायात यंदा तोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST2019-10-30T05:00:00+5:302019-10-30T05:00:12+5:30
दिवाळी सण पाच दिवस साजरा करतात. पाचही दिवस घरी दीप प्रकाशमान करून पंचपक्वान तयार करतात. तसेच पाचही दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात येतोे. या दिवाळीसाठी गोंदिया शहरातील व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात फटाक्याची दुकाने लावली. यामध्ये लवंगी, लक्ष्मी, टू ईन वन, अनार झाड अशा विविध व्हेरायटीची ५ ते ३ हजार रूपयांपर्यंतचे फटाके उपलब्ध होते. सुरूवातीला ग्राहकांनी प्रतिसाद दिला.

फटाके व्यवसायात यंदा तोटा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दिवाळीसाठी गोंदिया शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची बाजारपेठ सजली होती. मात्र ऐन दिवाळीच्या दिवशीच जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस झाला. परिणामी ग्र्राहकांनी फटाके खरेदीकडे पाठ फिरवली. त्यामुळे व्यावसायिकांनी मोठ्या आशेने लावलेला फटाक्याचा व्यवसायाला फटका बसला असून व्यावसायिकांवर संकट कोसळले आहे.
दिवाळी सण पाच दिवस साजरा करतात. पाचही दिवस घरी दीप प्रकाशमान करून पंचपक्वान तयार करतात. तसेच पाचही दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात येतोे.
या दिवाळीसाठी गोंदिया शहरातील व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात फटाक्याची दुकाने लावली. यामध्ये लवंगी, लक्ष्मी, टू ईन वन, अनार झाड अशा विविध व्हेरायटीची ५ ते ३ हजार रूपयांपर्यंतचे फटाके उपलब्ध होते. सुरूवातीला ग्राहकांनी प्रतिसाद दिला.
दरम्यान शनिवारी रात्री व रविवारी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे फटाके खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा असे तीन मुख्य दिवस संपले. मात्र विक्रेत्यांच्या फटाक्याची पाहिजे त्या प्रमाणात विक्री झाली नाही.
दिवाळी संपल्यानंतर फटाक्याला मागणी नसते. त्यामुळे त्याची विक्री कशी करायची, असा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे.
निवडणुकीमुळे मिळाला दिलासा
२१ आॅक्टोबरला विधानसभा निवडणूक पार पडली. तर २४ आॅक्टोबरला निकाल घोषित झाला. त्यामुळे जो उमेदवार विजयी झाला. त्या उमेदवाराच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची खरेदी केली. त्यामुळे काही विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र त्यानंतर पावसाला सुरु वात झाल्याने व्यवसायाला फटका बसला.
अर्ध्यापेक्षा अधिक माल शिल्लक
पूर्वी शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्याला मागणी असायची. त्यामुळे दरवर्षींपेक्षा यावर्षी मोठ्या प्रमाणात विविध पद्धतीचे फटाके बोलविले. मात्र यावर्षी ऐन दिवाळीच्या दिवशी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे फटाके विक्री पाहिजे त्या प्रमाणात झाली नाही. परिणामी अर्ध्यापेक्षा अधिक माल शिल्लक आहे. त्यामुळे खरेदी केलेल्या मालाची किंमत निघणेही कठिण झाल्याचे एका व्यापाऱ्याने सांगितले.