७० प्रशिक्षणार्थ्यांचे नुकसान टळले
By Admin | Updated: July 13, 2016 02:34 IST2016-07-13T02:34:14+5:302016-07-13T02:34:14+5:30
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या तीन व्यवसायातील ७० प्रशिक्षणार्थ्यांचे इंजिनियरींग

७० प्रशिक्षणार्थ्यांचे नुकसान टळले
तिरोडा : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या तीन व्यवसायातील ७० प्रशिक्षणार्थ्यांचे इंजिनियरींग ड्रार्इंग विषयाच्या तिसऱ्या सत्राच्या निकालात गुणपत्रिकेत ० गुण दर्शविले होते. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांचे पुढील सत्राचे नुकसान होत असून त्यांना पुन्हा परीक्षा फार्म भरण्यास विभागाने सांगितले होते. परंतु इंजिनियरींग ड्रार्इंग विषयात ० गूण असू शकत नाही, हे आमदारांच्या निदर्शनास आले. आ. विजय रहांगडाले यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई येथे संचालक दयानंद मेश्राम व सहसंचालक योगेश पाटील यांच्याशी संपर्क साधला. यात सदर चूक एनसीव्हीटी नवी दिल्लीच्या सॉफ्टवेअरची असल्याचे समजले. तसेच आ. रहांगडाले यांनी सहसंचालकांना निकालाची यादी मागितली. त्यामुळे आयटीआय तिरोडा येथील ७० प्रशिक्षणार्थ्यांच्या शिक्षणाचे व पुढील सत्राचे नुकसान टळले. आमदारांनी आयटीआयमध्ये जाऊन सर्व प्रशिक्षणार्थ्यांची भेट घेतली व निकालाची यादी देवून त्यांना दिलासा दिला. (तालुका प्रतिनिधी)