गोंदियाच्या गाडगेनगरातील ३ लाखांचा ऐवज पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:48 IST2021-02-05T07:48:07+5:302021-02-05T07:48:07+5:30
अजय होशीलाप्रसाद मिश्रा हे घराच्या दाराला कुलूप लावून व्यापार करण्याकरिता आमगाव, सालेकसा येथे गेले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्याने ...

गोंदियाच्या गाडगेनगरातील ३ लाखांचा ऐवज पळविला
अजय होशीलाप्रसाद मिश्रा हे घराच्या दाराला कुलूप लावून व्यापार करण्याकरिता आमगाव, सालेकसा येथे गेले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या समोरील दाराचे कुलूप तोडून बेडरूममधील गोदरेज आलमारीमध्ये ठेवलेली सोन्याची साखळी वजन १५ ग्रॅम, एक जोड फुलवाले कानजोडी वजन १९ ग्रॅम, एक जोडी मोठी कानातील बाली वजन १ ग्रॅम, एक सोन्याचा सिक्का वजन १० ग्रॅम, दोन सोन्याची अंगठी वजन ९ ग्रॅम, एक सोन्याचे लॉकेट वजन ४ ग्रॅम, तीन छोटे सोन्याचे लॉकेट वजन ९ ग्रॅम, एक सोन्याची नथनी वजन ३ ग्रॅम, दोन नाकातील खडा वजन ३ ग्रॅम, दोन सोन्याचे छोटे टॉप्स बटन वजन अंदाजे ९ ग्रॅम, तुटलेले जुने सोन्याचे दागिने वजन अंदाजे १० ग्रॅम एकूण अंदाजे वजन ९२ ग्रॅम सोन्याचे दागिने एकूण किंमत २ लाख ३० हजार व ७५ हजार रुपये रोख असा एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा माल चोरून नेला. तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद रघुवंशी करीत आहेत.