कमावत्या वधूकडेच वरपित्याची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2016 02:02 IST2016-05-16T02:02:26+5:302016-05-16T02:02:26+5:30

वाढत्या महागाईमुळे आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत व्हावी म्हणून वरपिता नेहमीच प्रयत्नशील असतो.

The look of the masterpiece of the earning bride | कमावत्या वधूकडेच वरपित्याची नजर

कमावत्या वधूकडेच वरपित्याची नजर

गोंदिया : वाढत्या महागाईमुळे आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत व्हावी म्हणून वरपिता नेहमीच प्रयत्नशील असतो. या तत्वाला धरूनच वरपित्यांकडून आपल्या मुलांसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या वधूचा शोध घेतला जातो. सध्या ग्रामीण भागासह शहरी भागातील वरपित्याची नजर कमावत्या मुलींकडे वळली आहे. त्या दृष्टीने वरपिता ग्रामीण भागासह शहरी भागातही मुलींसाठी शोध मोहीम राबवीत असल्याचे दिसून येत आहे.
पूर्वी वधू सुंदर असावी यावर भर दिले जात होते. परंतु आता वधू कमावती आहे की नाही? याचा विचार सर्वात जास्त केला जातो. पैशाला अधिक पसंती देण्याची बाब तरुणांमध्ये असल्याचे चित्र आहे. नोकरीची कमतरता व योग्यतेनुसार काम नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे कमावत्या लग्नासाठी प्रथम प्राधान्य देण्याची जणू प्रथाच आता सुरू झाली आहे. मुलांप्रमाणे मुलीसुध्दा कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी समर्थ आहेत. अशास्थितीत वराकडील पित्यांचे एखाद्या कमावत्या मुलींकडे लक्ष असल्याचे चित्र आहे. मुलगा शासकीय नोकरीवर असला की वराचा भाव अधिकच वधारतो. त्यानुसार वधूलाही नोकरी पाहिजे असा कल आहे.

Web Title: The look of the masterpiece of the earning bride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.