किशोरींनी आहारासोबत स्वच्छतेकडे लक्ष द्यावे
By Admin | Updated: April 2, 2015 01:17 IST2015-04-02T01:17:31+5:302015-04-02T01:17:31+5:30
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राजीव गांधी सबला योजनेंतर्गत किशोरवयीन मुलींचे प्रशिक्षण पांढरी बिटस्तरीय भुसारीटोला येथे उत्साहात पार पडले.

किशोरींनी आहारासोबत स्वच्छतेकडे लक्ष द्यावे
सडक-अर्जुनी : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राजीव गांधी सबला योजनेंतर्गत किशोरवयीन मुलींचे प्रशिक्षण पांढरी बिटस्तरीय भुसारीटोला येथे उत्साहात पार पडले.
सदर प्रशिक्षण १० दिवसीय होते. या प्रशिक्षणात विविध तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेला मानव समूह तसेच किशोरी व महिलांच्या आरोग्याकडे, खानपानाकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे एक सक्षम व सुदृढ महिला चांगल्या निरोगी बालकास जन्मास घालू शकत नाही. यासाठी किशोरी तसेच महिलांनी वैयक्तिक स्वच्छतेवर व सकस आहारावर भर द्यावे, असे प्रतिपादन वडेगाव येथील पदवीधर शिक्षक रामप्रसाद मस्के यांनी केले.
प्रशिक्षण वर्गात प्रशिक्षण कौशल्य, जीवन कौशल्य, सकारात्मक दृष्टिकोन, एड्स व जाणीवजागृती, लोकसंख्या शिक्षण यावर मार्गदर्शन केले. डी.आर. जिभकाटे यांनी व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर, आरोग्य सेवक उंदिरवाडे यांनी वैयक्तिक स्वच्छतेबाबद, के.डी. वाढई यांनी खेळ व गीत गायन, आरोग्य पर्यवेक्षक अशोक शेंडे यांनी महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले.
क्षेत्रभेट व समारोपीय कार्यक्रम मांडोदेवी देवस्थान सभागृहात पार पडला. सदर प्रशिक्षण वर्गाला सडक-अर्जुनीचे प्रकल्प अधिकारी बोबडे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. महिलांनी स्वच्छतेकडे व आपल्या आरोग्याकडे लक्ष दिल्यास बाळ सुदृध व सशक्त जन्माला येऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक पर्यवेक्षिका अहिल्या शेंदरे तर आभार वनिता परशुरामकर यांनी मानले. वंदेमातरम गीत गायनाने तसेच सामूहिक भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमासाठी शांता परशुरामकर, मीरा चव्हाण, पटले, हुमेश्वरी पारधी, रहांगडाले, कापगते यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)