जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे नजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 06:00 AM2020-02-12T06:00:00+5:302020-02-12T06:00:17+5:30

नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाचे १८ सदस्य असून अध्यक्षही त्यांच्याच आहे. तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सात, कॉँग्रेसचे नऊ व शहर परिवर्तन आघाडीचे आठ सदस्य आहेत. या आघाडीत पाच सदस्य बहुजन समाज पक्षाचे, दोन सदस्य शिवसेनेचे तर एक सदस्य अपक्ष आहे.

Look at the decision of the Collector | जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे नजरा

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे नजरा

Next
ठळक मुद्देआघाडीचा गटनेता ठरणार : गटनेत्यासाठी आज सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अवघ्या ३ दिवसांवर आलेल्या नगर परिषद विषय समिती सभापती निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. नगर परिषदेत सध्या भारतीय जनता पक्षाची सत्ता असली तरी त्यांच्यासाठी ही निवडणूक एवढी सोपी ठरणारी दिसत नाही. त्यात शहर परिवर्तन आघाडीच्या गटनेत्याला घेऊन बुधवारी (दि.१२) जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी आहे. यामुळे सर्वांच्या नजरा त्यांच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. त्यानुसार पुढे काय समीकरण तयार होतात त्यावरच ही निवडणूक अवलंबून राहणार आहे.
नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाचे १८ सदस्य असून अध्यक्षही त्यांच्याच आहे. तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सात, कॉँग्रेसचे नऊ व शहर परिवर्तन आघाडीचे आठ सदस्य आहेत. या आघाडीत पाच सदस्य बहुजन समाज पक्षाचे, दोन सदस्य शिवसेनेचे तर एक सदस्य अपक्ष आहे.
नगर परिषदेतील सदस्य बघता ११ सदस्यांची विषय समिती तयार होते. यात सदस्य संख्यानिहाय भाजपचे पाच तर राष्ट्रवादी, कॉँग्रेस व आघाडीचे प्रत्येकी दोन सदस्य असतात. विशेष म्हणजे, आघाडीतील गटनेतासह तीन सदस्य भाजप समर्थक असल्यामुळे भाजपची सदस्य आठ होत असून त्यांचे सभापती निवडले जात आहे.
यंदा मात्र ही बाब हेरून आठ सदस्य असलेल्या आघाडीतील बहुजन समाज पक्षाच्या पाच सदस्यांनी बहुमताने ललीता यादव यांना गटनेता निवडले असून तसे पत्र जिल्हाधिकाºयांनाही दिले आहे. गटनेता निवडीच्या विषयाला घेऊन जिल्हाधिकाºयांनी बुधवारी (दि.१२) सुनावणी ठेवली आहे.
यात गटनेतापदी ललीता यादव वैध ठरल्यास शनिवारी (दि.१५) होणाºया नगर परिषद सभापतींच्या निवडणुकीचे चित्रच बदलण्याची शक्यता आहे. यामुळेच सर्वांच्या नजरा आता जिल्हाधिकाºयांच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.

अशा समीकरणाची शक्यता
सध्या नगर परिषदेच्या विषय समित्यांमध्ये भाजपचे पाच सदस्य असून राष्ट्रवादीचे दोन, कॉँग्रेसचे दोन व आघाडीचे दोन सदस्य आहेत. विशेष म्हणजे, आघाडीचे गटनेता राजकुमार कुथे असल्याने ते त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोन सदस्यांची नावे विषय समितीत पाठविणार असल्याची माहिती आहे. यामुळे भाजपची सदस्य संख्या सात होत असून त्यांचेच सभापती निवडून येतात. यंदा मात्र आघाडीच्या गटनेता म्हणून ललीता यादव यांना अधिकार मिळाल्यास त्यातच राष्ट्रवादी व कॉँग्रेस आघाडीच्या सोबत राहिल्यास त्यांची सदस्य संख्या सहा होणार असून भाजपला मात्र खुर्चीपासून दूर रहावे लागणार आहे. या समीकरणाला बघता सर्वच पक्षांमध्ये वातावरण तापलेले दिसत आहे.

Web Title: Look at the decision of the Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.