जोपर्यंत कष्टाचे दाम नाही, तोपर्यंत काम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:33 IST2021-08-13T04:33:13+5:302021-08-13T04:33:13+5:30

गोरेगाव : वराई पैसे देण्याच्या मागणीला घेऊन राईस मिलमध्ये काम करणाऱ्या हमालांनी मागील तीन दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले ...

As long as there is no price for hard work, there is no work | जोपर्यंत कष्टाचे दाम नाही, तोपर्यंत काम नाही

जोपर्यंत कष्टाचे दाम नाही, तोपर्यंत काम नाही

गोरेगाव : वराई पैसे देण्याच्या मागणीला घेऊन राईस मिलमध्ये काम करणाऱ्या हमालांनी मागील तीन दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत आम्हाला आमच्या कष्टाचे दाम मिळत नाही, तोपर्यंत काम नाही अशी भूमिका हमालांनी घेतली आहे. दरम्यान, गुरुवारी माजी आ. दिलीप बन्सोड यांनी तालुक्यातील गणखैरा येथे हमाल असोसिएशनच्या पदाधिकारी व हमालांशी चर्चा केली. यावेळी हमालांनी कामाचा योग्य मोबदला मिळत नसल्याचे बन्सोड यांना सांगितले.

माजी आ. दिलीप बन्सोड यांनी हमालांना त्यांच्या कामाचा मोबदला व हक्क मिळवून देऊ अशी ग्वाही दिली. आपण राईस मिल मालकांशी स्वत: चर्चा करून हमाल असोसिएशनसह बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रदीप शहारे, आदेश फुले उपस्थित होते.

Web Title: As long as there is no price for hard work, there is no work