‘लोकमत’ युवा नेक्स्टची सदस्यता नोंदणी सुरू

By Admin | Updated: October 7, 2014 23:37 IST2014-10-07T23:37:16+5:302014-10-07T23:37:16+5:30

महाविद्यालयीन युवकांसाठी सशक्त व्यासपीठ होत असलेला लोकमत युवा नेक्स्ट विद्यार्थी व युवावर्गासाठी आधारस्तंभ ठरत आहे. युवा नेक्स्टच्या नोंदणीने जिल्हाभरात वेग पकडला असून केवळ

'Lokmat' youth registration begins registration | ‘लोकमत’ युवा नेक्स्टची सदस्यता नोंदणी सुरू

‘लोकमत’ युवा नेक्स्टची सदस्यता नोंदणी सुरू

गोंदिया : महाविद्यालयीन युवकांसाठी सशक्त व्यासपीठ होत असलेला लोकमत युवा नेक्स्ट विद्यार्थी व युवावर्गासाठी आधारस्तंभ ठरत आहे. युवा नेक्स्टच्या नोंदणीने जिल्हाभरात वेग पकडला असून केवळ २०० रूपये शुल्कात ही नोंदणी होत आहे.
युवा वर्गाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने युवा नेक्स्टतर्फे वर्षभर होणाऱ्या विविध रंगारंग कार्यक्रमाची रेलचेल व तज्ज्ञांद्वारे विद्यार्थ्यांना बौद्धिक मार्गदर्शन मिळणार आहे. प्रत्येक सदस्यास १५ हजार रूपयांच्या हमखास भेटवस्तू मिळणार आहेत. यात आठ जीबीचा पेन ड्राईव्ह, १५ दिवसांतच हार्डवेअर प्रशिक्षण, १५ दिवसांचे मॉडलिंग प्रशिक्षण, आयटीचे मराठी संगणक प्रशिक्षण, नेत्र तपासणी, दंत तपासणी, आरोग्य तपासणी, नि:शुल्क हेअर कटिंग, नि:शुल्क मॉडेलिंग, फोटो, नि:शुल्क जीम, नि:शुल्क फेशियल, १५ दिवसांतच नि:शुल्क इंटेरियर डिझायनिंग प्रशिक्षण तसेच विशेष आकर्षण असलेली युथ एमपॉवरमेंट पुस्तक, आकर्षक ओळखपत्र यासह भाग्यवान विजेत्यांना हवाई सफर करण्याची संधी. अशा अनेक संधी सदस्यांना मिळणार आहेत. याबरोबरच लाखोंचे बक्षिसे युवा नेक्स्टच्या सदस्यांना जिंकता येणार आहेत. यामध्ये कॅमेरा टॅब, आयपॉड, वॉच, कॉलेज बॅग, मोबाईल, गोल्ड कॉईन आदी उत्तेजनार्थ बक्षिसांची रेलचेल राहणार आहे. याशिवाय १३ भाग्यवान सभासदांना गोवा हवाई सफरचा लाभ घेता येणार आहे. वर्षभर होणाऱ्या राज्यस्तरावरील युवा महोत्सव, संगीत महोत्सव, दांडिया धमाल, जो जिता वही सिकंदर, युवा गॉट्स टॅलेंट, लोकमत एकांकी स्पर्धा, फॅशन शो अशा विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी सदस्यांना मिळणार आहे.
या उपक्रमाच्या संधीचा लाभ सर्व युवावर्गाने घ्यावा, असे आवाहन लोकमत युवा नेक्स्टच्या जिल्हा संयोजिका दिव्या भगत यांनी केले आहे. अधिक माहिती व नोंदणीकरिता लोकमत जिल्हा कार्यालय, गोरेलाल चौक, गोंदिया (९८८१०११८२१, ०७१८२-२३०५०७) यावर संपर्क साधावा.
लोकमत युवा नेक्स्टचे सदस्यत्व ग्रहण करण्यासाठी अर्जुनी/मोरगाव येथे संतोष बुकावन (९४२३११५०३८), संजयकुमार बंगळे (९४२३७३९४७७), आमगाव येथे यशवंत मानकर (९४२१८०८४४४), राजीव फुंडे (९४२३३८४१२२), तिरोडा येथे लक्ष्मीनारायण दुबे (९७६४१४०६००), नवेगावबांध येथे प्रकाश वलथरे (९३३७६२९८८०), सडक/अर्जुनी येथे राजेश मुनिश्वर (९४२३११५०२५), गोरेगाव येथे दिलीप चव्हाण (८००७३६६०७१), सालेकसा येथे विजय मानकर (९८२३७४९१४४), साखरीटोला येथे सागर काटेखाये (९५४५१७५०३०) यांच्याशी संपर्क साधावा. (प्रतिनिधी)

Web Title: 'Lokmat' youth registration begins registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.