‘लोकमत’ने बालकांना संस्कारमय केले

By Admin | Updated: March 28, 2017 00:52 IST2017-03-28T00:52:49+5:302017-03-28T00:52:49+5:30

बालपणापासूनच बालकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी संस्कारांची आवश्यकता असते. विशिष्ट वयात योग्य संस्कार केले....

Lokmat has promoted children | ‘लोकमत’ने बालकांना संस्कारमय केले

‘लोकमत’ने बालकांना संस्कारमय केले

अनिलकुमार मंत्री : ‘संस्काराचे मोती’ उपक्रमाचे बक्षीस वितरित
अर्जुनी-मोरगाव : बालपणापासूनच बालकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी संस्कारांची आवश्यकता असते. विशिष्ट वयात योग्य संस्कार केले तर बालकांचे भविष्य घडते. लोकमत ‘संस्काराचे मोती’ या स्पर्धात्मक उपक्रमाद्वारे बालकांना संस्कारमय करण्याचे कार्य ‘लोकमत’ करीत असल्याचे प्रतिपादन प्राचार्य अनिलकुमार मंत्री यांनी केले.
सरस्वती विद्यालयात आयोजीत ‘लोकमत संस्काराचे मोती’ मधील लकी ड्रॉ विजेत्यांना पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी पर्यवेक्षिका विना नानोटी उपस्थित होत्या. स्पर्धेतील विजेती प्रथम क्रमांकाची विद्यार्थिनी स्नेहा प्रशांत पालिवाल हिला टॅब देण्यात आला. आदीत्य कारूसेना सांगोळे याला क्रीकेट कीट, नयना दिलीप कापगते हिला फुटबॉल, प्रणय मधूर कुरसूंगे याला स्केट्स, भावेश नरेश परशुरामकर प्रणय देवदास मस्के व वृषाली सुखदेव शहारे यांना वॉटर बॉटल देण्यात आली. संचालन शशिकांत लोणारे यांनी केले.

Web Title: Lokmat has promoted children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.