‘लोकमत दीपोत्सव’ म्हणजे बौद्धिक मेजवाणीच

By Admin | Updated: November 6, 2015 02:54 IST2015-11-06T02:54:32+5:302015-11-06T02:54:32+5:30

लोकप्रियतेच्या आणि खपाच्या बाबतीत राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या लोकमतच्या ‘दीपोत्सव’मुळे दिवाळीत जसी

'Lokmat Dipotsav' is a intellectual messenger | ‘लोकमत दीपोत्सव’ म्हणजे बौद्धिक मेजवाणीच

‘लोकमत दीपोत्सव’ म्हणजे बौद्धिक मेजवाणीच

गोंदिया : लोकप्रियतेच्या आणि खपाच्या बाबतीत राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या लोकमतच्या ‘दीपोत्सव’मुळे दिवाळीत जसी गोड पदार्थांची मेजवाणी मिळते, तशीच बुद्धीलाही चांगली मेजवाणी मिळते, असे गौरवोद्गार मान्यवर पाहुण्यांनी व्यक्त केले. लोकमतच्या लोकप्रिय अशा ‘दीपोत्सव’ या दिवाळी अंकाचा कौटुंबिक प्रकाशन सोहळा गुरूवारी (दि.५) सायंकाळी ४ वाजता लोकमत जिल्हा कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा कोषागार अधिकारी दिगंबर नेमाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, डी.बी. सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंजन नायडू, इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) अध्यक्ष डॉ.घनश्याम तुरकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
दरवर्षी लोकमत वृत्तपत्र समुहाकडून दिवाळी सणानिमित्त महाराष्ट्रातील वाचकांसाठी विविध माहितीने परिपूर्ण असा ‘दीपोत्सव’ विशेषांक प्रकाशित केला जातो. यावर्षीसुद्धा सदर प्रकाशन सोहळा गुरूवारी गोंदियासह महाराष्ट्रातील लोकमतच्या सर्व जिल्हा कार्यालयात एकाचवेळी पार पडला.
प्रास्ताविक लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने यांनी तर संचालन नरेश रहिले यांनी केले. आभार सालेकसाचे तालुका प्रतिनिधी विजय मानकर यांनी केले. यावेळी लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख मिलिंद वाढई, संपादकीय सहकारी कपिल केकत, देवानंद शहारे, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी सुब्रत पाल, संपादकीय सहकारी विकास बोरकर, मुकेश शर्मा, वितरण प्रतिनिधी पंकज धमदार, जाहीरात प्रतिनिधी अतुल कडू, छोटी जाहीरात प्रतिनिधी राजीव फुंडे, इव्हेंट प्रतिनिधी दिव्या भगत, श्रीकांत पिल्लेवार, संगणक आॅपरेटर पंकज गहरवार, राजेश नक्षिणे, प्रफुल्ल गणवीर, हितेश बन्सोड, लोकमतचे प्रमुख एजंट राजकुमार ठाकूर व आॅफिस बॉय संतोष बिलोणे आदी उपस्थित होते.
या अंकाची नोंदणी जिल्हा कार्यालयात सुरू असून लवकरच तालुका स्तरावर उपलब्ध होणार आहे. (प्रतिनिधी)

अभिरूचीपूर्ण दिवाळी अंक
४यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हा माहिती अधिकारी खडसे म्हणाले, दिवाळीमध्ये खाण्याच्या गोड पदार्थासह वाचनासाठीही काहीतरी गोड हवे असते. त्याची पूर्णता लोकमतचा हा ‘दीपोत्सव’ करते. या विशेषांकात सामाजिक क्षेत्र व इतर सर्वच क्षेत्राशी निगडीत माहिती असून निश्चितच ते वाचकांसाठी ज्ञानदायी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आॅडिट ब्युरो आॅफ सर्कुलेशनच्या अहवालानुसार राज्यात प्रथम क्रमांकाचे मानाचे स्थान लोकमत वृत्तपत्राने पटकाविले आहे. वर्तमानपत्रासह हा विशेषांकसुद्धा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
४ प्राचार्य डॉ.अंजन नायडू म्हणाले, लोकमत हे वृत्तपत्र एकमेव न्यूज एजन्सी आहे ज्यांच्याकडून समाजातील सर्व घटकांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. अतिशय आकर्षक असा हा दीपोत्सव त्याचाच भाग आहे. जिल्हा कोषागार अधिकारी नेमाडे यांनी सदर विशेषांक घरोघरी पोहोचून जनजागृतीचे माध्यम ठरेल, अशी आशा व्यक्त केली. तर जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांनी लोकमत व क्रीडा क्षेत्र यांचा अभेद्य संबंध असल्याचे सांगत दीपोत्सव विशेषांक घरोघरी पोहोचावा, अशा शुभेच्छा दिल्या.

Web Title: 'Lokmat Dipotsav' is a intellectual messenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.