आमगावात लोधी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा
By Admin | Updated: April 28, 2017 01:54 IST2017-04-28T01:54:47+5:302017-04-28T01:54:47+5:30
येथील साई मंगलम लॉनमध्ये लोधी राजपूत समाजाचा सामूहिक आदर्श विवाह सोहळा पार पडला.

आमगावात लोधी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा
पाच जोडप्यांचे शुभमंगल : काँग्रेसच्या नेत्या साधना भारतीही विवाहबद्ध
आमगाव : येथील साई मंगलम लॉनमध्ये लोधी राजपूत समाजाचा सामूहिक आदर्श विवाह सोहळा पार पडला. यामध्ये पाच वर-वधूसोबत मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्याच्या खैरलांजी तालुक्यातील वर लोधी पवन बहेटवारसोबत काँग्रेसच्या राष्ट्रीय स्टार प्रचारक लोधी साधना भारती यांचा विवाह पार पडला.
लहानपणापासून सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका, सोबत आंतराष्ट्रीय सर्वधर्म अनुयायी लोधी, लोधा, लोध राजपूत एकता मिशनच्या मुख्य संयोजिक आणि समारंभाचे मुख्य अतिथी म्हणूनही साधना भारती उपस्थित होत्या. याप्रसंगी त्या म्हणाल्या, पूत सपूत को क्यो धन संचय, पूत कपूत तो क्यो धन संचय. सोबत भारतीय समाजाला हुंडा प्रथेपासून मुक्त करण्याचा संकल्प करावा लागेल. हुंडा प्रथा, कन्या भु्रण हत्या व अकारण खर्चाला समाप्त करुन सामूहिक आदर्श विवाह समारंभामध्ये सर्वांनी आपल्या मुला-मुलींचे व बहीण-भावांचे विवाह करावे, असे आवाहन त्यांनी केले.
फक्त अडीच वर्षे वयापासून मागील २१ वर्षात सामाजिक, आध्यात्मिक आणि राजकीय मंचावर हजारो जनसभा व रॅलींना संबोधित करणाऱ्या जगातील सर्वात कमी वयाची साधना भारती आहेत. त्या म्हणाल्या, कन्या भु्रण हत्या व हुंडा या कुप्रथांपासून भारतीय समाजाला मुक्त करण्याकरिता केंद्र सरकारने सकारात्मक विचार करुन सामूहिक विवाह समारंभामध्ये विवाह करणाऱ्या युवक-युवतींना सरकारी नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याची तरतूद संसदमध्ये पारित करावे. तेव्हाच खऱ्या अर्थाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदीद्वारे चालविण्यात येणारी ‘मुली वाचवा, मुली शिकवा’ ही मोहीम सार्थक होईल.
मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, राजस्थान आणि उत्तरप्रदेश यासह कित्येक राज्यातील राज्य सरकार सामूहिक विवाह समारंभांना प्रोत्साहन देण्यासाठी निधी देतात. हे हुंडा प्रथेच्या निर्मूलनासाठी सार्थक नाही. सामूहिक विवाह समारंभात लग्न करणाऱ्या मुला-मुलींना पैसा देण्याऐवजी राज्य सरकारने शिक्षणाच्या आधारावर त्यांना सरकारी नोकरी देण्यासाठी पुढाकार घ्यावा. देशाचे उद्योगपती आणि तानाशाह यांनी आपल्या फॅक्ट्री, कारखान्यांमध्ये सर्वात अगोदर योग्यतेच्या आधारावर नोकरी द्यावी, असे त्या म्हणाल्या.
विवाह सोहळ्यात खा. अशोक नेते, सामाजिक न्यायामंत्री राजकुमार बडोले, राजस्थानचे शिवराजसिंह लोधी, उद्योगपती गणपतसिंह पटेल मसकरे, सहषराम कोरोटे, माजी जि.प. अध्यक्ष रजनी नागपुरे, आ. गोपालदास अग्रवाल, आ. संजय पुराम, गिरीधर बघेल, माजी आ. भेरसिंह नागपुरे, आंधप्रदेशचे हुकुमसिंह देशराजन, उत्तरप्रदेशचे हरिशसिंह नसरररिया, हीना कावरे, भागवत नागपुरे, ओडीसाचे आयुक्त एम.बी.एस. राजपूत, वित्त विभागाचे उपायुक्त अमरपालसिंह, इंजि. भुमेश लोधी, इंजि. राजू ठकरेले, राष्ट्रीय उपाध्यक्ष शिव नागपुरे, प्रदेश अध्यक्ष ईश्वर उमरे, कमलेश्वर वर्मा, रजमान लोधी, गुनाराम लिल्हारे, चित्रलेखा वर्मा, कुंदन कटारे, विमल नागपुरे, छाया दसरे, हेमलता पतेह, आशिष नागपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक जागेश्वर लिल्हारे यांनी मांडले. संचालन मनिषा लिल्हारे, डी.के. बनोटे, सरला दमाहे यांनी केले. आभार देवेंद्र मच्छिरके यांनी मानले. कार्यक्रमासाठी रोशन लिल्हारे, रोशन गराडे, युनाज बसोने, केवलचंद मच्छिरके, ओंकार लिल्हारे, शंकर नागपुरे, सेवक बनोटे, प्रेमचंद दशरिया, नरेंद्र लिल्हारे, गोविंद लिल्हारे, रोषलाल लिल्हारे, संतोष नागपुरे, लक्ष्मण नागपुरे, रामचंद लिल्हारे, कृष्णकुमार गयैगयै, नूतन दमाहे, सुखवंता ग्यानीराम बनोटे, पुष्पा दिलीप ढेकवार, दीपिका मच्छिरके, प्रीती लिल्हारे, दुर्गेश्वरी दमाहे, बद्रीप्रसाद दशरिया, नेतराम मच्छिरके, भोजराज दमाहे, देवेंद्र मचिया, निरज नागपुरे, राजकुमार नागपुरे आदिंनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)