शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनने सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST

कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व उद्योग आणि व्यवसायांना बंदी घालण्यात आली होती. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही व्यवसाय आणि उद्योगांमध्ये शिथिलता देण्यात आली. यामुळे बांधकाम व्यवसायाचा देखील समावेश आहे. त्यानुसार लॉकडाउनमुळे बंद पडलेले बांधकाम जोमाने सुरु झालेले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. या दरम्यान सर्वच व्यवसाय बंद होते. त्यामध्ये बांधकाम व्यवसाय सुद्धा अडचणीत आला होता. मात्र मध्यंतरी या व्यवसायास शिथिलता दिल्याने सद्यस्थितीत बांधकाम व्यवसाय पुन्हा सुरु झाले आहे. सध्या सुरु असलेली कामे पावसाळा सुरु होण्यापूर्वी होणे गरजेचे होते. तरीही सिमेंट, लोखंड, वीट, रेती या बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यांचे दर कमालीचे वधारले आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व उद्योग आणि व्यवसायांना बंदी घालण्यात आली होती. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही व्यवसाय आणि उद्योगांमध्ये शिथिलता देण्यात आली. यामुळे बांधकाम व्यवसायाचा देखील समावेश आहे. त्यानुसार लॉकडाउनमुळे बंद पडलेले बांधकाम जोमाने सुरु झालेले आहे. मात्र बांधकाम व्यवसाय सुरु असला तरी त्यासाठी लागणारे साहित्य आता सुमारे ३० टक्क्याने महागले आहे. सीमेंटच्या प्रती पोत्यामागे ८० रुपये वाढ झाली आहे.लॉकडाऊनपूर्वी सीमेंट बॅगचा दर २७० ते ३०० रुपये होता. आता हा दर ३६० ते ४०० रुपये झाला आहे. तथापि भाव वधारले असताना देखील विशेषत: सीमेंटचा तुटवडा भासत असल्याने निर्धारित किमतीपेक्षाही चढ्या दराने सीमेंटची विक्री सध्या होत आहे. यासोबतच लोखंड (सळाख)च्या भावातही कमालीची वाढ झालेली आहे. लॉकडाऊनपूर्वी सहा एमएम वगळता इतर मापाच्या लोखंडी गजाचे भाव कमी अधिक प्रमाणात ३६०० रुपये क्विंटल होता. तो आता तब्बल हजार रुपयांनी वाढला असून त्याचे दर ४ हजार ८०० पेक्षा अधिक क्विंटलने विक्रीला जात आहे. पावसाळा लागण्यापूर्वी बांधकाम पूर्णत्वास जाणे गरजेचे असल्याने अनेकांना नाईलाजाने भडकलेल्या दरात तर कधी बांधकाम साहित्य विक्रेत्यांच्या मनमानीप्रमाणे चढ्या दरात साहित्य खरेदी करावेच लागत असल्याने आर्थिक फटका बसत आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना