शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

उभ्या ट्रकवर धडकले एलसीबीचे वाहन; पोलीस ठार, दोनजण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2022 13:50 IST

ढिमरटोली येथील घटना

गोंदिया : रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे वाहन धडकल्याने एक पोलिस कर्मचारी ठार, तर दोन गंभीर जखमी झाले. ही घटना ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ढिमरटोली येथील विकास राइस मिलसमोर ७ डिसेंबरच्या पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस जुगारावर कारवाई करण्यासाठी अर्जुनी-मोरगाव येथे गेले होते. रात्री अर्जुनी-मोरगाववरून गोंदियाकडे परतत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे वाहन (एमएच ३५ एजी ७५७८) हे रस्त्यावर उभे असलेल्या ट्रक (एमएच ४० वाय ५६८६) वर धडकले. यात पोलिस शिपाई विजय मानकर (बक्कल नंबर २०९५) यांचा मृत्यू झाला, तर पोलिस उपनिरीक्षक गोपाल कापगते व पोलिस हवालदार तुलसीदास लुटे (बक्कल नंबर १२३१) हे गंभीर जखमी झाले. गंभीर जखमींना गोंदियाच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस हवालदार सुरेंद्र खोब्रागडे यांच्या तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलिसांनी  भा.दं.वि.च्या कलम ३०४ अ ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मुलाचे प्रेमही मिळू शकले नाही

या अपघातात मृत्यू झालेल्या विजय मानकर यांना आठवडाभरापूर्वी पुत्ररत्न प्राप्त झाले. चिमुकल्याचे नामकरण होण्याच्या आधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि विजयची प्राणज्योत मालवली. चिमुकल्याचे प्रेमही विजयला मिळू शकले नाही. परिणामी, हळहळ व्यक्त होत आहे.

केटीएसमध्ये दिली सलामी

कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी विजय मानकर यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर केटीएस येथेच जिल्हा पोलिसांनी सात फेऱ्या झाडून त्यांना सलामी दिली. त्यानंतर त्यांचे पार्थिव रुग्णवाहिकेने त्यांच्या स्वगावी परसोनी, जि. यवतमाळ येथे नेण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यूgondiya-acगोंदिया