जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये दारुची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:29 IST2021-04-08T04:29:05+5:302021-04-08T04:29:05+5:30
गोंदिया : रेल्वे सुरक्षा दलाने विशेष मोहीम राबवून जनशताब्दी एक्स्प्रेसमधून दारूची तस्करी करणाऱ्या एका इसमाला रंगेहात पकडले. ही कारवाई ...

जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये दारुची तस्करी
गोंदिया : रेल्वे सुरक्षा दलाने विशेष मोहीम राबवून जनशताब्दी एक्स्प्रेसमधून दारूची तस्करी करणाऱ्या एका इसमाला रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.५) दुपारी २.४० वाजताच्या सुमारास करण्यात आली. आरपीएफ नागपूर मंडळाचे सुरक्षा आयुक्त पंकज चुग व सहायक सुरक्षा आयुक्त एस.डी.देशपांडे यांच्या मार्गदर्शनात गोंदिया रेल्वे सुरक्षा दलाचे प्रभारी निरीक्षक नंदबहादूर, उपनिरीक्षक मयंक मिश्रा, मुख्य आरक्षक राजेंद्र रायकवार, पी.दलाई व आरक्षक नासिर खान यांच्या चमू रेल्वे परिसरात विशेष अभियानांतर्गत तैनात होती. दरम्यान, रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर उभ्या असलेल्या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या डब्बा क्रमांक १३ जवळ एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत आढळला. पोलीस चमूने चौकशी केल्यावर त्याने आपले नाव रोहित अग्रवाल (३८) रा. रायपुरा, पो.रायपूर छत्तीसगड असे सांगितले. त्याच्याजवळील दोन्ही बॅग व पिशवीची झळती घेण्यात आली. त्यात १८० मिलीने भरलेले देशी दारूचे ७० पव्वे आढळले. हा आरोपी अवैधरीत्या रेल्वे मार्गाने दारूची तस्करी करीत होता. गोंदिया रेल्वे पोलिसांच्या सुपुर्द करण्यात आले. त्याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(अ), ६५ (ई), ६६ (१) (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.