तिरोड्यात दारूविक्रेत्यांची पोलिसांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:48 IST2021-02-05T07:48:09+5:302021-02-05T07:48:09+5:30
तिरोडा पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक राधा काशीनाथ लाटे या पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन अवैध दारू विक्रत्यांकडे झडती घेण्यासाठी गेल्या ...

तिरोड्यात दारूविक्रेत्यांची पोलिसांना मारहाण
तिरोडा पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक राधा काशीनाथ लाटे या पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन अवैध दारू विक्रत्यांकडे झडती घेण्यासाठी गेल्या असताना तीन आरोपींनी त्यांना काठीने मारून जखमी केले. त्यांना शिवीगाळ करून पुढे खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देण्यात आली. त्या घरझडतीत ८०० पोती मोहफूल किंमत ६ लाख ४० हजार व दारू गाळण्याचे साहीत्य दोन लोंखडी शेगडी किंमत १ हजार रुपये, ५ प्लॅस्टिक डबकीमध्ये प्रति डबकी १५ लिटर याप्रमाणे ७५ लिटर किंमत ३ हजार ७५० रुपयांचा असा एकूण ६ लाख ४४ हजार ७५० रुपयाचा माल मिळाला. तिरोडा पोलिसांनी भादंविच्या कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६, ३४, सहकलम ६५ (ई)(फ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक हनवते करीत आहेत.