लायन्स क्लबतर्फे भर्रेगाव येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:01 IST2021-09-02T05:01:01+5:302021-09-02T05:01:01+5:30

देवरी : तालुक्यातील भर्रेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भर्रेगाव,कोसाटोला व दर्रेटोला येथील लहान लहान मुला-मुलींकरिता देवरीच्या लायन्स क्लबतर्फे श्रीकृष्ण जन्मोत्सव ...

Lions Club Celebrates Shrikrushna Janmotsav at Bharregaon () | लायन्स क्लबतर्फे भर्रेगाव येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा ()

लायन्स क्लबतर्फे भर्रेगाव येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा ()

देवरी : तालुक्यातील भर्रेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भर्रेगाव,कोसाटोला व दर्रेटोला येथील लहान लहान मुला-मुलींकरिता देवरीच्या लायन्स क्लबतर्फे श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन सोमवारी भर्रेगाव येथील जि.प. प्राथमिक शाळेच्या पटांगणावर साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून लहान मुला-मुलींकरिता संगीत खुर्ची, दहीहंडी फोड व राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब देवरीच्या अध्यक्ष पारस कटकवार हे होते. याप्रसंगी क्लबचे झोन चेअरपर्सन पिंकी कटकवार, सदस्य ज्योती रामटेककर, पुष्पा नळपते, अनिल मेश्राम, भर्रेगाव शाळा समितीचे बिसराम सलामे, सेवकराम दोनोडे, खोटेले, मोहन कोचे, प्रमिला बहेकार, सुनीता मेश्राम, खोटेले, शेंडे यांच्यासह या कार्यक्रमात सहभाग घेणारे मुला-मुलींचे पालक व गावकरी उपस्थित होते. यावेळी संगीत खुर्ची, दहीहंडी फोड व राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धेत विजयी स्पर्धकांना प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार व सहभाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रोत्साहनपर पुरस्कार वितरण करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे किट ही वाटप करण्यात आले. प्रास्ताविकात देवरी लायन्स क्लबचे अध्यक्ष पारस कटकवार यांनी मागील वर्षी मार्च महिन्यापासून आपल्या देशासह पूर्ण राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी लावण्यात आली होती. त्यामुळे आपण कोणतेही सण व उत्सव साजरा करु शकलो नाही. मात्र आता निर्बंध शिथिल झाल्याने भारतीय संस्कृती व सण उत्सव टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.

Web Title: Lions Club Celebrates Shrikrushna Janmotsav at Bharregaon ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.