लाईफलाईन एक्स्प्रेस गोंदिया स्थानकावर दाखल

By Admin | Updated: April 27, 2016 01:47 IST2016-04-27T01:47:08+5:302016-04-27T01:47:08+5:30

बहुप्रतिक्षित लाईफलाईन एक्स्प्रेसचे गोंदिया रेल्वे स्थानकावर आगमन झाले. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता....

Lifestyle Express filed at Gondia station | लाईफलाईन एक्स्प्रेस गोंदिया स्थानकावर दाखल

लाईफलाईन एक्स्प्रेस गोंदिया स्थानकावर दाखल

विनामूल्य उपचार व शस्त्रक्रिया : ४ ते २५ मे पर्यंत मिळणार सेवा
गोंदिया : बहुप्रतिक्षित लाईफलाईन एक्स्प्रेसचे गोंदिया रेल्वे स्थानकावर आगमन झाले. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते यांनी लाईफलाईन एक्स्प्रेसमध्ये आलेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
जिल्ह्यातील गोरगरीब व गरजू लोकांसाठी वरदान ठरणाऱ्या व वैद्यकीय क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या या सुसज्ज अशा लाईफ लाईन एक्स्प्रेसला २३ वर्षानंतर दुसऱ्यांचा गोंदियाला आणण्याचे कार्य जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, डॉ.अजय केवलीया, डॉ.रवि धकाते, डॉ.हरीश कळमकर यांनी केले आहे.
वैद्यकीय सेवेने सुसज्ज अशा या चलित रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची चमू राहणार आहे. हे डॉक्टर्स डोळयांचे परिक्षण व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, फाटलेले ओठ व भाजलेल्या शरीरावरील परिक्षण तथा उपचार, शस्त्रक्रिया, कानावरील शस्त्रक्रिया, पोलिओ शस्त्रक्रिया, दातांचे परिक्षण व उपचार, मिर्गी तपासणी व उपचार, स्त्रीरोग उपचार आदी प्रकारच्या आजारांची तपासणी, उपचार व आवश्यकता असल्यास मोफत शस्त्रक्रिया करणार आहे.
लाईफ लाईन एक्स्प्रेसची रु ग्णसेवा ४ ते २५ मे पर्यंत जिल्ह्यातील जनतेसाठी उपलब्ध राहणार आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी या लाईफलाईन एक्स्प्रेसच्या रु ग्णसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Lifestyle Express filed at Gondia station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.