शहिदांच्या कुटुंबीयांना आयुष्यभर मोफत वैद्यकीय सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:45 IST2021-02-05T07:45:35+5:302021-02-05T07:45:35+5:30
कार्यक्रमाचे उद्घाटन समूहाचे संस्थापक रमन रामादे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयेशचंद्र रामादे होते. यावेळी गजेंद्र सहसराम कावडे ...

शहिदांच्या कुटुंबीयांना आयुष्यभर मोफत वैद्यकीय सेवा
कार्यक्रमाचे उद्घाटन समूहाचे संस्थापक रमन रामादे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयेशचंद्र रामादे होते. यावेळी गजेंद्र सहसराम कावडे व माजी सैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमात गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील ११ शहीद जवानांच्या कुटुंबीयांना शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. तसेच फैमिली हेल्थ कार्ड वाटप करण्यात आले. ज्यामध्ये थल सेनेतील शहीद सखारामजी ठाकरे, शहीद योगराज ग्यानीरामजी बिसेन, शहीद गोपीचंद लक्ष्मण शेंडे, शहीद संजयकुमार क्षीरसागर, सीआरपीएफमधील शहीद मंगेश बालपांडे, शहीद लिखनलाल श्यामरावजी कुरसुंगे, शहीद हेतराम कटरे तर महाराष्ट्र पोलीसमधील- शहीद संजय बृजलाल पटले, शहीद मूलचंद श्यामराव भोयर, शहीद ईशांत रामरतन भुरे शहीद प्रभाकर पांडे यांचे कुटुंबीय उपस्थित होते. अजित कुमार यांनी सहयोग संस्था प्रामुख्याने बँकिंग, वैद्यकीय आणि शिक्षणक्षेत्रात कार्यरत असून समाजातील प्रत्येक घटक, विशेषत: मध्यमवर्ग, निम्न-मध्यमवर्ग, दुर्बल घटक, ग्रामीण महिला वर्ग, शेतकरी बांधव, मुले आणि तरुणांना, सामाजिक, शैक्षणिक, शारीरिक व आर्थिक स्वरूपात जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर बनवून राष्ट्रउभारणीसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.