ग्रंथालय हे ज्ञानाचे केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:31 IST2021-02-09T04:31:42+5:302021-02-09T04:31:42+5:30
मुरदोली : जिल्हा ग्रंथालय संघ गोंदियाचे २१ वे वार्षिक अधिवेशन जिजामाता सार्वजनिक वाचनालय गोरेगाव येथे पार पडले. एम. आर. ...

ग्रंथालय हे ज्ञानाचे केंद्र
मुरदोली : जिल्हा ग्रंथालय संघ गोंदियाचे २१ वे वार्षिक अधिवेशन जिजामाता सार्वजनिक वाचनालय गोरेगाव येथे पार पडले. एम. आर. रंगनाथन, जिजामाता यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश जनबंधू, उद्घाटक अरविंद ढोणे, प्रमुख पाहुणे खोमेंद्र बोपचे, शिवकुमार शर्मा, निरीक्षक अस्मिता मंडपे, डी.डी. रहांगडाले, अंजनकर उपस्थित होते. जिल्ह्यातील ग्रंथालयाच्या व्यथा व ग्रंथालय गावात चालविताना अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे सांगितले. संघाचे अध्यक्ष शिवकुमार शर्मा यांनी, वाचनालय चळवळीत शासन दरबारी कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते, यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. रमेश जनबंधू यांनी, गावातील ग्रंथालय हे ज्ञानाचे केंद्र आहे. इंग्रजकाळातसुध्दा ग्रंथालये होती म्हणून बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी ज्ञान घेऊ शकले. कालांतराने १९६७ ग्रंथालय कायदा उदयाला आला आणि गाव तेथे वाचनालय संकल्पना पुढे आली. त्यावेळी शासनाने या संकल्पनेकडे लक्ष दिले. मात्र आताच्या सरकारचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. ग्रंथालयात ज्ञान संपादन केलेला व्यक्ती हा महान बनू शकतो, तो शासनास मान्य नाही असे दिसून येत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजनकर यांनी केले. आभार डी. एस. बिसेन यांनी मानले.