शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

वाचनालयांना मिळालेच नाही पाच हजार रूपये

By admin | Updated: November 10, 2014 22:46 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेने गावात विकास गंगा आणली. गावातील तंटे सामोपचाराने मिटवून नागरिकांचा वेळ व पैसा वाचविला. तंटामुक्त झालेल्या गावांना राज्यशासनाने लोकसंख्येच्या आधारावर

गोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेने गावात विकास गंगा आणली. गावातील तंटे सामोपचाराने मिटवून नागरिकांचा वेळ व पैसा वाचविला. तंटामुक्त झालेल्या गावांना राज्यशासनाने लोकसंख्येच्या आधारावर लाखो रुपये वाटले. या रकमेचा विनियोग गाव विकासावर करण्याचे शासनाने सूचविले. गावातील मुलांंना वाचनाची सवय लागावी. त्यांना नवनवीन माहितीची पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी तंटामुक्त बक्षीस रकमेतून पाच हजार रुपये तंटामुक्त समितीला गावाच्या वाचनालयाला द्यावे लागणार आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम १५ आॅगस्ट २००७ पासून राज्यात सुरू करण्यात आली. या मोहीमेच्या माध्यमातून गावाचा कायापालट करण्याचा प्रयत्न मोहीम राबविणाऱ्या समित्यांनी केला. गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडवून गावातील अवैध धंद्यावर आळा घातला. गावातील अवैध धंदे बंद केल्यावर त्या अवैध धंदे करणाऱ्यांंना सन्मानाच्या रोजगाराकडे वळविण्याचा प्रयत्न केला. गावातील रोजगार हमी योजनेच्या कामावर त्यांंना प्राधान्य देण्यात आले. गावात जातीय सलोखा कायम राखण्यासाठी सर्वधर्म समभाव मेळाव्याचे आयोजन, महापुरूषांच्या जयंती उत्सव शांततेत पार पाडण्याचे कार्य केले. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी समित्यांनी स्वत: आंतरजातीय विवाह घडवून आणले. तंटामुक्त गाव मोहिमेच्या लोकचळवळीने गावागावातील अवैध दारू हद्दपार झाली. जिल्ह्यातील अनेक गावे व्यसनमुक्तीच्या मार्गावर आहेत. गावातील सर्व सण पोलीस बंदोबस्ताशिवाय शांततेत पार पाडण्याचे कार्य करण्यात आले. रक्तदान शिबिरे घेणे, पशुलसीकरण शिबिराचे आयोजन करणे, शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करणे, उत्तम बि-बियाणांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी जनजागृती करण्याचे काम तंटामुक्त समित्यांनी केले. लोकसंख्येच्या आधारावर तंटामुक्त गावांना लाखो रुपयाचे पुरस्कार वाटले. या पुरस्कार प्राप्त गावांनी पुरस्कारांच्या रकमेचा विनियोग शासन निर्णय पत्रीकेनुसार करण्याचे सूचविले. मात्र या शासन निर्णय नियोजन पत्रिकेत बौद्धिक स्तर उंचावण्यावर बक्षिसाचा खर्च करता येईल असे नमूद केले नव्हते. या संदर्भात अनेक गावातील तक्रारी शासन दरबारी गेल्या. त्यासाठी गृहविभागाने २६ डिसेंबर २०१२ रोजी एक परिपत्रक काढून बक्षीस रकमेतील पाच हजार रुपये ग्रंथ/पुस्तके खरेदी करण्यासाठी देण्यात यावे असे सुचविले. ग्रामीण भागातील जनतेचा बौद्धिक स्तर उंचावण्यासाठी वाचनालयांना आर्थिक मदत तंटामुक्त बक्षीस रकमेतून देता येईल. (तालुका प्रतिनिधी)