वरिष्ठ श्रेणी लागू होईपर्यंत एकस्तर सुरू राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:31 IST2021-09-18T04:31:49+5:302021-09-18T04:31:49+5:30
देवरी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ देवरीतर्फे मंगळवारी शिक्षकांच्या विविध प्रश्नांना घेऊन गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे यांच्यासह चर्चा करण्यात ...

वरिष्ठ श्रेणी लागू होईपर्यंत एकस्तर सुरू राहणार
देवरी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ देवरीतर्फे मंगळवारी शिक्षकांच्या विविध प्रश्नांना घेऊन गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे यांच्यासह चर्चा करण्यात आली. या वेळी मोटघरे यांनी वरिष्ठ श्रेणी लागू होईपर्यंत एकस्तर सुरू राहणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
चर्चेदरम्यान कोविडने मृत्यू पावलेल्या शिक्षकांना विमा संरक्षण लाभाचे तीन शिक्षकांचे प्रस्ताव जि.प.ला पाठविण्यात आले. त्यापैकी दोन शिक्षकांचे प्रस्ताव कोविडने मृत झाल्याचा वैद्यकीय पुरावा नसल्याने परत आल्याचे सांगितले. वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणीसाठी पात्र शिक्षकांचे प्रस्ताव सेवापुस्तिकासह जि.प.ला पाठविण्यात यावे. ६ व्या व ७ व्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीला वित्त विभागाच्या मंजुरीसाठी सेवापुस्तिका पाठविण्याचे आश्वासन मोटघरे यांनी दिले. या वेळी जीपीएफ कपातीचे शेड्यूल दरमहा वेतन बिलासोबत पाठविणे, सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पेन्शन फाइल सेवानिवृत्तीच्या ६ महिन्यांपूर्वी कार्यालयाच्या मार्फत तयार करून मंजुरीसाठी जि.प.ला पाठविणे, सेवानिवृत्ती प्रस्ताव हे कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीकडून न बनविता फक्त कार्यालयीन लिपिकांकडून बनवून पाठवावे, अशी मागणी संघटनेने या वेळी लावून धरली. शिष्टमंडळात संघाचे अध्यक्ष डी.टी. कावळे, सरचिटणीस एस.यू. वंजारी, जिल्हा पदाधिकारी कापसे उपस्थित होते.