काम होऊ दे, नववर्ष सुखाचे जाऊ दे!
By Admin | Updated: January 2, 2016 08:35 IST2016-01-02T08:35:23+5:302016-01-02T08:35:23+5:30
वर्ष २०१५ गेले आणि २०१६ या नववर्षाचा पहिला दिवस शुक्रवारी उजाडला. मागील वर्षात झाले ते झाले, मात्र नवीन

काम होऊ दे, नववर्ष सुखाचे जाऊ दे!
गोंदिया : वर्ष २०१५ गेले आणि २०१६ या नववर्षाचा पहिला दिवस शुक्रवारी उजाडला. मागील वर्षात झाले ते झाले, मात्र नवीन वर्ष सुखा-समाधानाचे जावे यासाठी गोंदिया शहरासह जिल्हाभरातील नागरिकांनी देवाच्या दरबारी धाव घेतली. त्यामुळे शुक्रवारी सर्व धार्मिक स्थळांवर भाविकांची एकच गर्दी दिसून आली.
मागील वर्षात काही चांगले तर काही वाईट अनुभव आले. गुन्हेगारी, खून, अत्याचार यासारख्या घटनांनी मागचे वर्ष गाजले व कलंकितही झाले. सोबतच दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईमुळे वाढलेला त्रास ही सर्व देशावरची संकटे आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात यंदा झालेला कमी पाऊस व त्यामुळे हातून गेलेले पीक , अपघात व गुन्हेगारी घटनांनीही जिल्हा गाजला.
एकंदर मागील वर्षात रोज काही ना काही बरेवाईट ऐकायला आले. मात्र २०१५ या नववर्षात असे काही अभद्र ऐकायला येऊ नये. मागील वर्षी झाले ते झाले, चुकांना पदरात पाडून हे वर्ष कुशल, मंगल झाले पाहीजे अशीच सर्वांची मागणी आहे.
आपली ही मागणी देवापुडे मांडण्यासाठी शुक्रवारी (दि.१) नागरिकांनी मंदिर, मस्जीद, गुरूद्वारे व चर्चमध्ये जाऊन आपापल्या प्रार्थना पद्धतीनुसार देवाला साकडे घातले. (शहर प्रतिनिधी)
हनुमान मंदिरात एकच गर्दी
४शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील हनुमान मंदिराची शहरासह लगतच्या परिसरातही ख्याती आहे. जागृत मंदिर म्हणून हे मंदिर ओळखले जात असून नेहमीच या मंदिरात गर्दी असते व दूरवरून लोकं येथे हनुमंताच्या दर्शनासाठी येतात. नववर्षाचा पहिला दिवस असल्याने हनुमंताला पूर्ण वर्ष सुख,समाधानाचे जावे हे साकडे घालण्यासाठी शुक्रवारी नागरिकांनी एकच गर्दी केली. सकाळच्या आरतीपासूनच मंदिरात भाविकांची गर्दी दिसून येत होती. विशेष म्हणजे नववर्षाचे निमित्त साधून मंदिरात हनुमान चालीसा पाठचे आयोजन करण्यात आले होते.
न्यू इयर सेलिब्रेशन धार्मिक स्थळांवर
४२०१५ ला बाय-बाय करण्यासाठी थर्टीफर्स्टची सेलीब्रेशन पार्टी करून मात्र नवीन वर्षाची सुरूवात देवदर्शनाने करण्याकडे नागरिकांचा कल दिसला. नवीन वर्षात सुख,स् ामृद्धी व समाधान लाभावे यासाठी देवाला साकडे घालून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. त्यानुसार सकाळपासून अगोदर घरातील थोरामोठ्यांचे चरणस्पर्श करून व त्यानंतर आपापल्या धर्मस्थळांवर जाऊन नागरिकांनी आपल्या इष्ट देवाचा आशीर्वाद घेण्यास पसंती दर्शविली. यामुळेच हॉटेल्समध्ये गर्दी असतानाच धार्मिक स्थळांवरही नागरिकांची गर्दी बघावयास मिळाली.