दोन सरकारांच्या कारभारात पुजारीटोला धरणाकडे पाठ

By Admin | Updated: May 16, 2017 01:04 IST2017-05-16T01:04:52+5:302017-05-16T01:04:52+5:30

सिंचनाची सोय करण्यासाठी सालेकसा तालुक्यात पुजारीटोला धरणाची निर्र्मिती १९६८ ला करण्यात आली.

Lesson to the dam in the administration of the two governments | दोन सरकारांच्या कारभारात पुजारीटोला धरणाकडे पाठ

दोन सरकारांच्या कारभारात पुजारीटोला धरणाकडे पाठ

लोकमत न्यूज नेटवर्क
बिजेवार : सिंचनाची सोय करण्यासाठी सालेकसा तालुक्यात पुजारीटोला धरणाची निर्र्मिती १९६८ ला करण्यात आली. या धरणाच्या देखरेखीची जबाबदारी महाराष्ट्र व मध्यप्रदेश सरकारकडे देण्यात आली. परंतु हेवेदावे सुरू झाल्यामुळे या धरणाकडे दोन्ही सरकारच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. परिणामी पुजारीटोला धरणावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या थांबली.
पावसाळ्याच्या दिवसात पर्यटकांना आकर्षीक करणारे पुजारीटोला धरण वाघनदीवर बांधण्यात आले. हे धरण लहान असले तरी या धरणाला शिरपूरबांध या धरणाची साथ आहे. धरण तयार केल्यापासून येथे पर्यटकांची संख्या दररोज संख्या वाढत होती. सुरूवातीला या धरणाजवळ बाग तयार करण्यात आली होती. परंतु बागेकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही बाग उजाड झाली. या धरणाचे पाणी महाराष्ट्र व मध्यप्रदेशात जात असल्याने या धरणाच्या सौंदर्यीकरणाची जबाबदारी दोन्ही शासनावर होती. या ठिकाणी मध्यप्रदेश शासनाने विश्रामगृह तयार केले होते. परंतु तयार केल्यापासून त्या विश्रामगृहाची देखभाल दुरूस्ती न केल्यामुळे आज ते विश्रामगृह मृत्यूशय्येवर आहे.
महाराष्ट्रात मध्यप्रदेश सरकारचे विश्रामगृह जीर्णावस्थेत आहे. या ठिकाणी सानने बाग तयार करायला हवे. मुलांसाठी झुले, घसरण पट्या तयार करून येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी पोषक वातावरण तयार करण्याची गरज आहे. आठ वर्षापूर्वी या धरणावरील बागेसाठी असलेले मोटारपंप बंद पडले तेव्हापासून बाग उजाडली. एकदा बंद पडलेले मोटारपंप आजही बंदच आहे.
१३ दरवाजे असलेले पुजारीटोला धरण पर्यटकांना आकर्षीत करते. मात्र येथे आलेल्या पर्यटकांना बसण्यासाठी जागा नाही. खाण्यापिण्यासाठी काही स्टॉल नाही, मुलांना खेळण्यासाठी साहित्य नाही यामुळे निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या पुजारीटोला धरणावर आलेल्या पर्यटकांना जास्त काळ घालवणे कठिण जाते. या धरणाच्या देखरेखीसाठी दरवर्षी पैसे येतात. ते पैसे उचचले जाते परंतु त्या धरणावर काहीच विकास कामे केले जात नाही. या धरणाकडे मध्यप्रदेश सरकार बारेबर महाराष्ट्र सरकानेही पाठ फिरवली आहे. आजघडीला परिसरातील विलोभनीय निसर्गरम्य हे परिसर आज उपेक्षित आहे.

Web Title: Lesson to the dam in the administration of the two governments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.