शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याने घेतला झाडावर आश्रय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 06:00 IST

पिंपळगाव परिसरात सर्वत्र उसाची शेती आणि त्याला लागूनच जंगल असल्याने मागील काही दिवसांपासून या परिसरात एका बिबट्याचा वावर होता. काही लोकांना रात्रीच्या वेळीही हा बिबट्या आढळला होता. दरम्यान शुक्रवारी दुपारच्या सुमारास पिंपळगाव खांबी येथील देवचंद शेंडे यांच्या घराबाहेरील सुबाभुळच्या झाडावर एका बिबट्याने ठाण मांडल्याचे आढळला.

ठळक मुद्देपिंपळगाववासीयांनी चार तास अनुभवला थरार । बिबट्याला पकडण्यात यश

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पिंपळगाव खांबी येथील देवचंद शेंडे यांच्या बागेतील बाभळीच्या झाडावर एका बिबट्याने आश्रय घेतला होेता. यामुळे पिंपळगावात खळबळ उडाली. या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी चार तास रेस्क्यू आॅपरेशन राबवून बिबट्याला जेरबंद केले. बिबट्याला जंगलात नेऊन सोडल्यानंतर पिंपळगाववासीयांनी सुटकेचा निश्वास सोडला.पिंपळगाव परिसरात सर्वत्र उसाची शेती आणि त्याला लागूनच जंगल असल्याने मागील काही दिवसांपासून या परिसरात एका बिबट्याचा वावर होता. काही लोकांना रात्रीच्या वेळीही हा बिबट्या आढळला होता. दरम्यान शुक्रवारी दुपारच्या सुमारास पिंपळगाव खांबी येथील देवचंद शेंडे यांच्या घराबाहेरील सुबाभुळच्या झाडावर एका बिबट्याने ठाण मांडल्याचे आढळला. झाडावर बिबट्या चढला असल्याचीही माहिती क्षणभरात गावभर पसरली. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. उत्सुकतेने बिबट्याला बघायला दोन ते अडीच हजार लोकांचा जमाव शेंडे यांच्या घराभोवती गोळा झाला. नवेगावबांध वन विभागाच्या चमूला याची माहिती देण्यात आली. प्रादेशिक वन विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी रोशन दोनोडे यांच्या नेतृत्त्वात एन. के. सरकार, सहायक वनपरिक्षेत्राधिकारी शिंदे, बहुरे, वनरक्षक मिथुन चव्हाण, वनविभागाचे कर्मचारी माहिती मिळतात त्वरीत घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी बिबट्या चढलेल्या झाडाच्या सभोवताल जाळे पसरवले. बिबट्या झाडाखाली उतरला तर जाळीत फसेल असा वन विभागाचा कयास होता. परंतु बिबट्याने चकमा देत घटनास्थळावरून पोबारा केला. आणि शेवटी एका पडक्या घरात आश्रय त्याने घेतला. त्याच्या पुढच्या बाजुला एका दिशेला मोकळी होती.मागचा भाग बंदिस्त असल्यामुळे, त्या घरात एका पेटी शेजारी लपून बसलेल्या बिबट्याला रेस्क्यू टीमच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जाळे टाकून पकडले. वनविभागाच्या चार तासाच्या रेस्क्यू आॅपरेशननंतर बिबट्याला पकडण्यात यश आले. यानंतर बिबट्याला जंगलात नेऊन सोडून दिले.यानंतर पिंपळगाववासियांनी सुटकेचा निश्वास सोडला.

टॅग्स :leopardबिबट्या