गोंदिया जिल्ह्यातील लोधीटोलात पट्टेदार वाघाची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 02:44 PM2020-11-16T14:44:29+5:302020-11-16T14:46:09+5:30

Gondia News Tiger गोंदिया शहरापासून अवघ्या सहा किमी अंतरावर असलेल्या लोधीटोला (चुटीया) येथील पटले यांच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत पट्टेदार वाघाचे अवशेष आढळले.

Leopard hunting in Lodhitola in Gondia district | गोंदिया जिल्ह्यातील लोधीटोलात पट्टेदार वाघाची शिकार

गोंदिया जिल्ह्यातील लोधीटोलात पट्टेदार वाघाची शिकार

Next
ठळक मुद्देतुकडे करून वेगवेगळ्या शेतात टाकलेआरोपींच्या शोधात वनाधिकारी


लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: शहरापासून अवघ्या सहा किमी अंतरावर असलेल्या लोधीटोला (चुटीया) येथील पटले यांच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत पट्टेदार वाघाचे अवशेष आढळले. हे वाघाचे शरीराचे तुकडे-तुकडे करून वेगवेगळ्या शेतात टाकण्यात आल्याचा प्रकार आज (दि.१६) नोव्हेंबरच्या सकाळी उघडकीस आला.
लोधीटोला येथील शेतकरी पटले यांच्या शेतात पट्टेदार वाघाचा मृतदेह पडला असल्याची माहिती गावकऱ्यांनी शेतकरी पटले यांना रविवारी सायंकाळी यांना दिली. त्यांनी ही माहिती वनािधकाऱ्यांना देईपर्यंत रात्र झाली होती. आज (दि.१६) रोजी वनाधिकारी व वन्यप्रेमी लोधीटोला येथील पटले यांच्या शेतात गेले असतांना त्या शेतात पट्टेदार वाघाचे अवशेष वेगवेगळ्या ठिकाणी आठळले. १२ ते १५ दिवसापूर्वी वाघाची शिकार करून त्या वाघाचे अवशेष शेतात टाकल्याने वाघाचा शरीर कुजलेल्या अवस्थेत होता. त्या वाघाच्या शरीराचे तुकडे-तुकडे शेतात वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात आले होते. ते गोळा करण्यात आले. करंट लावून किंवा विष देऊन त्या वाघाची शिकार करण्यात आली असावी असा कयास लावला जात आहे. घटनास्थळावर उपवनसंरक्षक कुलराजसिंग, सहाय्यक उपवनसंरक्षक राजेंद्र सदगीर, आकरे क्षेत्र सहाय्यक दखने वन्यजीवप्रेमी सावन बहेकार, मानद वन्यजीव रक्षक मुकूंद धुर्वे व पशूधन वैद्यकीय अिधकारी कटरे दाम्पत्य उपिस्थत होते. त्याच्यावर संस्कार करण्यात आला. आरोपींचा शोध वनविभाग घेत आहे.

Web Title: Leopard hunting in Lodhitola in Gondia district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.