बिबट्याने मांडले घरात ठाण; गोंदिया जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 10:41 IST2020-01-07T10:40:45+5:302020-01-07T10:41:15+5:30
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील चान्ना बाक्टी येथील एका गावकऱ्याच्या घरात मंगळवार सकाळपासून ठाण मांडले आहे.

बिबट्याने मांडले घरात ठाण; गोंदिया जिल्ह्यातील घटना
ठळक मुद्देघरातील मंडळी भयभीत
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील चान्ना बाक्टी येथील एका गावकऱ्याच्या घरात मंगळवार सकाळपासून ठाण मांडले आहे. सकाळी घरातील मंडळी बाथरूममध्ये गेली असता तेथे त्यांना बिबट्याचे पिल्लू आढळून आले. त्यांनी ही माहिती वनविभागाला कळविली आहे. या बिबट्याला घरातच बंद केले असले तरी गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.