शिकलेले मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही- डोंगरवार
By Admin | Updated: January 17, 2017 00:58 IST2017-01-17T00:58:22+5:302017-01-17T00:58:22+5:30
महापुरूषांचे केवळ पुतळे उभारुनच काही होणार नाही तर त्यांचे विचारही आपल्याला आत्मसात करावे लागतील.

शिकलेले मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही- डोंगरवार
सौंदड : महापुरूषांचे केवळ पुतळे उभारुनच काही होणार नाही तर त्यांचे विचारही आपल्याला आत्मसात करावे लागतील. शिकलेले मस्तक हे कुणासमोरही नतमस्तक होत नाही तर शिक्षण हे जगण्याचे मूळ आधार आहे, असे विचार अखिल भारतीय माळी संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरवार यांनी व्यक्त केले.
माळी महासंघाच्यावतीने येथे शनिवारी आयोजित महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
उद्घाटन पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून गायत्री इरले, मनोज अंबादकर, जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे, धनलाल नागरीकर, जि.प.सदस्य उषा शहारे,जगदीश लोहिया, सदू विठ्ठले, केशव बाळके, सरपंच पुष्पा बडोले, वसंत विठ्ठले, मंजु इरले, प्रिती गोटेफोडे, वच्छला जांभुळकर, वनिता इरले, संगीता इरले, लालचंद खडके, सुनील राऊत उपस्थित होते.
यावेळी नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रथम पारितोषीक विनीता इरले, द्वितीत हेमलता उपरीकर, तृतीय अनिल इरले यांनी पटकाविले. (प्रतिनिधी)