कर्जबाजारी शिक्षकाला बदलीवर सोडले

By Admin | Updated: October 13, 2014 23:22 IST2014-10-13T23:22:52+5:302014-10-13T23:22:52+5:30

जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी संस्था पतसंस्था मर्यादित गोंदियाच्या कोहमारा शाखेतून एका शिक्षकावर कर्ज असतानाही कर्ज नसल्याचे दाखविले. त्याला आंतरजिल्हा बदलीसाठी मोकळे करण्यात आले.

Leaner left the teacher in transit | कर्जबाजारी शिक्षकाला बदलीवर सोडले

कर्जबाजारी शिक्षकाला बदलीवर सोडले

गोंदिया : जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी संस्था पतसंस्था मर्यादित गोंदियाच्या कोहमारा शाखेतून एका शिक्षकावर कर्ज असतानाही कर्ज नसल्याचे दाखविले. त्याला आंतरजिल्हा बदलीसाठी मोकळे करण्यात आले.
सडक/अर्जुनी तालुक्याच्या प्राथमिक शाळा खजरी येथे कार्यरत अशोक नवनाथ राख या शिक्षकांची जून २०१४ मध्ये आंतरजिल्हा बदली झाली. त्या शिक्षकाला मोकळे करण्यासाठी संस्थानचे व बँकाचे कर्ज नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते. जून २०१४ मध्ये या शिक्षकावर ४ लाख ३२ हजार १९५ रुपये घेणे बाकी होते. परंतु सत्ताधारी संचालकाच्या मर्जीतील तो शिक्षक असल्यामुळे कोहमारा शाखेच्या लेटर पॅडवर कर्ज नसल्याचे खोटे प्रमाणपत्र सडक/अर्जुनी पंचायत समितीला देण्यात आले. त्या अर्जावर तारीख नाही जावक क्र. नाही तरी ही हे पत्र देण्यात आले. ते पत्र खरे की खोटे याची शहानिशा न करता खंडविकास अधिकारी यांनी जि.प.परभणीला सदर शिक्षकाला जाण्यासाठी मोकळे केले. या प्रकरणाची माहिती शिक्षक संघाचे डी.बी.बोरकर, विजय डोये यांनी झाली असता या प्रकरणाची त्यांनी माहिती काढली. जून २०१४ मध्ये ४ लाख ३२ हजार १९५ रुपये कर्ज घेतलेल्या शिक्षकाने २५ सप्टेंबर २ लाख ९० हजार रुपये जमा केले. तरी ही त्या शिक्षकावर १ लाख ४२ हजार १९५ रुपये थकीत आहे. यासंबधी सभासदानी मागीतलेले पत्र कोहमारा येथील शाखा व्यवस्थापकाने २७ सप्टेंबर २०१४ रोजी दिले. त्या पत्रात सदर कर्ज थकीत असल्याचे दाखविण्यात आले. मग व्यवस्थापकाने कोणत्या आधारावर कर्ज थकीत असल्याचे पत्र दिले.

Web Title: Leaner left the teacher in transit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.